मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /दादर गोळीबार प्रकरणी आमदार सदा सरवणकरांना क्लीन चिट, मग गोळी झाडली कुणी?

दादर गोळीबार प्रकरणी आमदार सदा सरवणकरांना क्लीन चिट, मग गोळी झाडली कुणी?

प्रभादेवी परिसरात दादरचे आमदार सदा सरवणकर यांचे समर्थक आणि शिवसैनिक यांच्यात जोरदार राडा झाला होता.

प्रभादेवी परिसरात दादरचे आमदार सदा सरवणकर यांचे समर्थक आणि शिवसैनिक यांच्यात जोरदार राडा झाला होता.

सदा सरवणकर गोळीबार प्रकरणी विधान परीषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 10 मार्च : मुंबईत काही दिवसांपूर्वी ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये शिवसेनाभवनाजवळ जोरदार राडा झाला होता. या राड्यात गोळीबार झाल्याची घडना घडली होती. या प्रकरणी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर आणि त्यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल केला होता. पण, आज अधिवेशनामध्ये आमदार सदा सरवणकर यांना क्लीन चिट देण्यात आली आहे.

दादरमधील गोळीबार प्रकरणाचे आज अधिवेशनात मुद्दा चर्चेला आला. सदा सरवणकर गोळीबार प्रकरणी विधान परीषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्यांवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.

(नागालँड सरकारला पाठिंबा दिल्यानंतर रामदास आठवलेंची शरद पवारांना खुली ऑफर)

यावेळी आमदार सदा सरवणकर यांना क्लीन चिट देण्यात आली. दादरमधील ज्या ठिकाणी गोळीबार झाला पण तो सदा सरवणकर यांनी केला नसल्याचा निष्कर्ष पोलिसांच्या तपासात समोर आला आहे. बॅलेस्टिक अहवालात बंदुकीतून गोळीबार झाला असल्याचा रिपोर्ट होता. मात्र पोलिसांनी आता आमदार सदा सरवणकर यांना क्लीन चीट दिली.

ठरलं! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप; बावनकुळेंचा मोठा गौप्यस्फोट, तारीखही सांगितली)

सरवणकर यांच्या बंदुकीतून गोळीबार झाला पण तो त्यांनी स्वतः केला नसल्याचा पोलिसांचा निष्कर्ष आहे. या तपासाची माहिती विधानसभेत सुद्धा पाठवण्यात आलेली आहे.या प्रकरणी FSL चा अहवाल आला आहे. घटनास्थळावरुन जप्त करण्यात आलेले काडतूस हे लोकप्रतिनिधीच्या बंदुकीतून सुटले असले तरी ते काडतूस अन्य व्यक्तीकडून फायर झाले आहे. या प्रकरणी लोकप्रतिनिधीसह ९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे तपास सुरू आहे.

उपस्थित प्रश्न -

- मग गोळीबार कोणी केला ?

- शस्त्र परवाना असताना शस्त्र दुसऱ्याच्या हातात देता येत नाही. मग सरवणकर यांनी ती कोणाला दिलं ?

- शस्त्र परवाना अटी शर्त भंग झाल्याचा अहवाल, पोलिसांनी पाठवला का?

- दुसऱ्यानं गोळीबार केला हा गुन्हा होतो. मग असा गुन्हा पोलिसांनी का नाही दाखल केला ?

काय आहे प्रकरण ?

प्रभादेवीमध्ये सप्टेंबर 2022 महिन्यात शिंदे विरुद्ध शिवसेना गटात जोरदार राडा झाला. बंडखोर आमदार सदा सरवणकर विसर्जन मिरवणुकीवेळी मनसेच्या स्वागत कमानीमध्ये दिसून आले होते. यावरून वातावरण तंग होते परंतु कोणताही वाद झाला नव्हता. हा वाद शनिवारी आणखी टोकाला गेला. शिंदे गटातील शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांना शिवसेना कार्यकर्त्यांनी चोप दिला. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. अखेर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.  यानंतर आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. या प्रकरणी सदा सरवणकर आणि त्यांचा मुलगा समाधान सरवणकर, संतोष तेलवणे यांच्यासह 10 जणांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार, आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला. तर पाचही शिवसैनिकांना जामिनावर सोडले होते.

First published:
top videos

    Tags: Mumbai police