मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नागालँड सरकारला पाठिंबा दिल्यानंतर रामदास आठवलेंची शरद पवारांना खुली ऑफर

नागालँड सरकारला पाठिंबा दिल्यानंतर रामदास आठवलेंची शरद पवारांना खुली ऑफर

रामदास आठवलेंची शरद पवारांना खुली ऑफर

रामदास आठवलेंची शरद पवारांना खुली ऑफर

नागालँडप्रमाणे मोदी सरकारलाही शरद पवार यांनी पाठिंबा द्यावा, असं आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

बीड/धाराशिव, 10 मार्च : ज्या पद्धतीने नागालँडमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नागालँड सरकारला पाठिंबा दिला. त्याचप्रमाणे मोदी सरकारला ही शरद पवारांनी पाठिंबा देऊन एनडीएमध्ये यावे, असं आवाहन रिपब्लिकन ऑफ इंडिया पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी बीडमध्ये केले. शरद पवार हे अनुभवी नेते आहे, याचा फायदा एनडीएला होईल. त्यामुळे शरद पवार यांनी युतीत यावे, असं आवाहन रामदास आठवले यांनी केलं आहे. आधीड बीड आणि नंतर धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना रामदास आठवले यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं आहे.

काय म्हणाले रामदास आठवले?

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शरद पवार यांना चिमटा काढत त्यांना खुली ऑफर दिली आहे. नागालँड राज्यामध्ये एनडीएचे सरकार बहुमतात आले आहे. असे असताना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गरज नसताना पाठिंबा दिला असल्याचे सांगत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शरद पवार यांना चिमटा काढला. जसा नागालँडमध्ये पाठिंबा दिला तसा महाराष्ट्र राज्य व केंद्रात शरद पवारांनी पाठिंबा द्यावा अशी मागणी आठवले यांनी केली आहे. रामदास आठवले आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावरती आले असता पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

वाचा - ठरलं! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप; बावनकुळेंचा मोठा गौप्यस्फोट, तारीखही सांगितली

आठवले यांच्या वक्तव्यानंतर एकच हशा

उस्मानाबादचे धाराशिव तर औरंगाबादचे संभाजीनगर या शहराचे नाव बदलण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांची आहे. ती मागणी केंद्र सरकारने पूर्ण केली आहे. त्या मागणीला आरपीआय पक्षाचा पाठिंबा असून त्याला विरोध करून काय होणार? असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. रामदास आठवले यांनी हे वक्तव्य केल्यानंतर पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला होता. दरम्यान या दोन्ही शहराच्या नावाला विरोध करण्यासाठी एमआयएम पक्ष आंदोलन करत असून त्यांचा तो अधिकार असल्याचे वक्तव्यही रामदास आठवले यांनी केले आहे.

भाजप-ठाकरे यांच्यातील वाद मिटला तर चांगला

वाद कधीही चांगले नसतात ते मिटलेच पाहिजेत. भारतीय जनता पक्ष व उद्धव ठाकरे यांच्यातील वाद मिटायला हवा. होळीच्या दिवशी देवेंद्र फडणवीस जे बोलले आहेत तसं त्यांनी पुढाकार घ्यायला हवा. पण उद्धव ठाकरे वाद मिटवतील, असं वाटत नाही. त्यांनी वाद मिटवला आणि परत आले तर ते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नको म्हणतील. त्यामुळे उद्धव ठाकरे वाद मिटवतील असं वाटत नाही, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

First published:
top videos

    Tags: Ramdas aathavale, Sharad Pawar