मुंबई, 31 मे : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोव्हिड-19 बाधित रुग्णांचे प्रमाण दुप्पट होण्याचा कालावधी (Doubling Rate) आता 13 वरुन 16 दिवस झाला आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या 24 पैकी 6 विभागांमध्ये तर हे प्रमाण 20 दिवस इतकं असून त्यात पूर्वी हॉटस्पॉट म्हणून ओळख बनलेल्या जी/दक्षिण, जी/उत्तर, एम/पूर्व विभाग यांचाही समावेश आहे. महानगरपालिका आयुक्त इ. सिं. चहल यांनी या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करुन सर्व संबंधितांचं अभिनंदन केलं आहे.
कोरोनाचा कहर! मुंबईत अवघ्या दीड-दोन तासांत 7 रुग्णांचा मृत्यू, नर्सनं दिली धक्कादायक माहिती
दरम्यान, कोरोना बाधिताची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर करावयाच्या कार्यवाहीमध्ये अधिक सुसूत्रता आणण्यासाठी महापालिका आयुक्तांनी नवीन निर्देशही दिले असून येत्या दोन ते तीन दिवसांत त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात सुरु करण्याचे आदेशही दिले आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष बैठकीदरम्यान चहल यांनी कोव्हिड-19 संक्रमण रोखण्यासाठी होत असलेल्या दैनंदिन कार्यवाहीचा आढावा घेतला. या बैठकीला सर्व अतिरिक्त महापालिका आयुक्त, संबंधित सहआयुक्त, उपायुक्त, रुग्णालयांचे प्रमुख यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पुण्यात एका दिवसात घटला रुग्ण वाढण्याचा आकडा, 24 तासांत मिळाली दिलासादायक बातमी
महानगरपालिका क्षेत्रामध्ये विविध कोरोना समर्पित रुग्णालयं, आरोग्य केंद्र आदी मिळून आजपर्यंत दाखल झालेल्या रुग्णांपैकी सुमारे 43 टक्के रुग्ण यशस्वीपणे उपचार घेऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाणदेखील वाढलं आहे. त्यासमवेत मुंबईत बाधित रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून 13 वरुन आता 16 दिवस इतका झाला आहे. म्हणजेच रुग्ण वाढण्याचा वेग मंदावतो आहे. मुंबईतील रुग्ण दुप्पटीच्या सरासरी 16 दिवसांच्या तुलनेत काही विभागांनी त्याहून जास्त चांगली कामगिरी केली आहे.
यामध्ये ई, एफ/उत्तर, जी/दक्षिण, जी/उत्तर, एच/पूर्व, एम/पूर्व विभागांची ही सरासरी 20 दिवस आहे. तर डि विभाग 19 दिवस, ए विभाग आणि एल विभाग 17 दिवस, के/पश्चिम विभाग 18 दिवस, बी विभाग 16 दिवस याप्रमाणे विविध विभागांमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला आहे. रुग्ण बरे होण्याचं वाढलेलं प्रमाण आणि संक्रमणाचा कालावधी वाढणं या दोन्ही कामगिरीबद्दल आयुक्त चहल यांनी सर्वांचं अभिनंदन केलं. तसेच, मुंबईतील कोरोना मृत्यूदरदेखील यापूर्वीच नियंत्रणात आला आहे. सध्या तो 3.2 टक्के म्हणजे राष्ट्रीय सरासरीच्या जवळ आहे.
Unlock-1: या नियमांसोबत मिळणार सूट, नजर टाकूयात काय सुरू होणार आणि काय बंद
दरम्यान, प्रयोगशाळांकडून पॉझिटिव्ह असल्याचा संदेश प्राप्त झाल्यानंतर अनेकदा रुग्ण गोंधळून जातात किंवा महानगरपालिकेकडून रुग्णाशी संपर्क होण्याआधीच घाबरुन जाऊन रुग्णालयांची शोधाशोध करु लागतात. त्यातून इतरांना बाधा होण्याची शक्यता असते. हा गोंधळ व धावपळ टाळता यावी, त्यांना दिलासा देता यावा यासाठी ही सुसूत्र पद्धत आता अवलंबली जाणार आहे. त्यासमवेत, विभाग कार्यालये, रुग्णालये व कोरोना केंद्राच्या व्यवस्थांमध्ये करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा सर्वंकष आढावा घेतल्यानंतर आयुक्त चहल यांनी समाधान व्यक्त केलं.
या कंपनीमध्ये पत्रकारांची जागा घेणार 'रोबो', सुमारे 50 जणांची नोकरी धोक्यात
संपादन - रेणुका धायबर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona vaccine, Lockdown