नवी दिल्ली, 15 एप्रिल : झपाट्याने पसरणाऱ्या कोरोनाव्हायरसला (Coronavirus) रोखण्यासाठी काही राज्यांमध्ये डिसइन्फेक्शन टनल (Disinfection Tunnel) तयार करण्यात आलं आहे. या टनेलमधून जाणा-या व्यक्तींवर चारही बाजूंनी औषधांचा शिडकाव केला जातो. हे टनेल बनवणा-या संस्थेने दावा केला आहे की, या टनेलमधून जाणारी व्यक्ती कोरोनाव्हायरसमुक्त होते. मात्र या टनेलमधून जाणा-या व्यक्तीचं काय? या टनेलमध्ये व्यक्तीवर शिडकाव केल्या जाणाऱ्या केमिकलचा त्याच्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतो, असं तामिळनाडूच्या आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने म्हटलं आहे. इंडिया टुडे ने दिलेल्या वृत्तानुसार, तामिळनाडूच्या आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दावा केला आहे की, क्लोरीन, अल्कोहोल आणि लाइजॉलचा मानवी शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतो. भारतातल्या वटवाघळांमध्ये सापडला CORONAVIRUS, हा घ्या पुरावा टनलमधून जाणाऱ्या व्यक्तीला वाटेल की आता आपण पूर्णपणे व्हायरसमुक्त झालो आहोत, त्यामुळे ती व्यक्ती हात धुणं तसंच व्हायरसपासून बचावाच्या इतर उपायांकडे दुर्लक्ष करेल आणि त्याचा उलट परिणाम दिसून येईल, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. यानंतर अशा डिसइन्फेक्शन टनलचा वापर करू नयेत अशा सूचना तामिळनाडूतील सर्व आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आल्यात. CoronaVirus विरोधात लढा; योद्धांच्या मदतीसाठी विषाणूचा नाश करणारा मायक्रोव्हेव शिवाय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसइन्फेक्टंट आणि Sanitizer चा शिडकावा करणारे असे टनेल वापरण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही, तशी मार्गदर्शक सूचनाही नाही. लवकरच नव्या मार्गदर्शक सूचना तयार केल्या जातील. संकलन, संपादन - प्रिया लाड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.