शेकडो दहशतवाद्यांना कोरोना, पाकमध्ये उपचारास नकार दिल्याने अतिरेकी भारतात प्रवेश करण्याच्या तयारीत

शेकडो दहशतवाद्यांना कोरोना, पाकमध्ये उपचारास नकार दिल्याने अतिरेकी भारतात प्रवेश करण्याच्या तयारीत

जैश-ए-मोहम्मदचे अनेक दहशतवादी कोरोना विषाणूच्या संसर्गाचे बळी ठरले आहेत. या दहशतवाद्यांनी पाकिस्तान सरकारकडे उपचारासाठी मदत मागितली आहे, परंतु त्यांच्यावर पाकिस्तान सरकारने उपचार करण्यास नकार दिला.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 एप्रिल : चीनच्या वुहानपासून पसरण्यास सुरुवात झालेला कोरोना आज जगभरात थैमान घालत आहे. अशातच सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जैश-ए-मोहम्मदचे अनेक दहशतवादी कोरोना विषाणूच्या संसर्गाचे बळी ठरले आहेत. या दहशतवाद्यांनी पाकिस्तान सरकारकडे उपचारासाठी मदत मागितली आहे, परंतु त्यांच्यावर पाकिस्तान सरकारने उपचार करण्यास नकार दिला. त्यामुळे काश्मीरहून पाकिस्तानला गेलेले अनेक दहशतवादी पुन्हा एकदा काश्मीरला परतण्याच्या मनस्थितीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शाहिद या लाहोरमध्ये राहणाऱ्या दहशतवाद्याने अनंतनागमध्ये राहणार्‍या त्याच्या कुटुंबातील लोकांना दूरध्वनी करून सांगितले आहे की, तो स्वतः कोरोना व्हायरस संसर्गाचा बळी ठरला आहे. वडिलांशी बोलताना शाहिदने असेही सांगितले की, त्याची तब्येत इतकी खालावली आहे की कदाचित हा त्यांचा अखेरचा फोन असेल. शाहिदची प्रकृती दिवसेंदिवस खराब होत आहे.

शाहीद कोरोनावरील उपचारासाठी अनेक सरकारी अधिकाऱ्यांना निरोप पाठविला होता, परंतु पाकिस्तान सरकारने या संदर्भात कोणतीही कार्यवाही केली नाही. जैश दहशतवाद्याने सांगितले की त्याचे साथीदार खूप घाबरले आहेत आणि काश्मीरमध्ये प्रवेश करण्यासाठी तयार आहेत.

वाचा-मुंबईत कोरोनाग्रस्त 29 वर्षीय तरुणीची आत्महत्या, रुग्णालयातच घेतला गळफास

पाकिस्तानमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ

पाकिस्तानमध्ये प्रत्येक नवीन दिवसासह कोरोना विषाणूची प्रकरणे समोर येत आहेत आणि मृतांचा आकडा वाढत आहे. एका दिवसात 276 नवीन रुग्णांची नोंद झाली असली तरी आतापर्यंत संक्रमित लोकांची संख्या 5 हजार 996 वर पोहोचली आहे. याशिवाय आतापर्यंत 107 लोकांचा मृत्यू झाला आहे. ‘डॉन’ च्या वृत्तानुसार, पाकिस्तानमध्ये फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची पहिली घटना घडली होती, परंतु एप्रिल 1 पासून देशात कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्या आणि संक्रमित होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शासन स्तरावर कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी पावले उचलली जात असली तरी, या असूनही कोरोनाचा प्रादुर्भाव सुरूच आहे.

वाचा-सावधान! 3 मेपर्यंत 'या' 13 सेवा राहणार बंद, वाचा संपूर्ण यादी

भारतात 10 हजारहून अधिक कोरोनाबाधित

देशात कोरोना विषाणूमुळे बळी पडलेल्या लोकांची संख्या मंगळवारी 353ने वाढली आहे, तर संक्रमित लोकांची संख्या 11 हजारांवर जाऊ शकते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की सोमवारी सायंकाळपासून मृत्यूची संख्या 29 झाली आहे, तर संक्रमित रुग्णांची संख्या 1463ने वाढली आहे.

वाचा-BREAKING : पुण्यात ससूनमधील आणखी एका डॉक्टरला कोरोनाची लक्षणं, 3 नर्स पॉझिटिव्ह

First published: April 15, 2020, 12:34 PM IST

ताज्या बातम्या