कोरोना संपल्याशिवाय सर्वसामान्यांना मुंबई लोकल प्रवास नाही?, वडेट्टीवारांनी केलं मोठं वक्तव्य

मुंबईची लोकल (Mumbai Local Train) सर्वसामान्यांसाठी कधी सुरु यावर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Congress Vijay Wadettivar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

मुंबईची लोकल (Mumbai Local Train) सर्वसामान्यांसाठी कधी सुरु यावर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Congress Vijay Wadettivar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

  • Share this:
    मुंबई, 21 जून: मुंबईची लोकल (Mumbai Local Train) सर्वसामान्यांसाठी कधी सुरु यावर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Congress Vijay Wadettivar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. कोरोना संपल्याशिवाय मुंबईची लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु होणार नसल्याचं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबईत कोरोनाचा प्रार्दुभाव कमी होत असून रुग्णसंख्या कमी होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्वांनाच लोकल कधी सुरु होणार याची प्रतिक्षा लागली आहे. विजय वडेट्टीवार यांना मुंबईची लोकल कधी सुरु होणार असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी कोरोना संपेपर्यंत मुंबईत लोकल सुरु होणार नसल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे. महापौर काय म्हणाल्या मुंबई शहराचा पॉझिटिव्हीटी रेटही कमी झाला आहे. मात्र मुंबई लोकलचे दरवाजे अजून सर्वसामान्यांसाठी उघडण्यात आलेले नाही. यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी माहिती देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबईतील कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे. रुग्णसंख्या कमी झाली की विचार करु. त्यानंतर सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवासास परवानगी देण्याचा विचार करावाच लागेल, असं महापौर म्हणाल्या आहेत. तसंच तिसरी लाट आली, तर ती सगळ्यांसाठी भयंकर असेल, असा इशाराही महापौरांनी दिला आहे. मुंबईत 500 ते 600च्या आसपास दररोज नवे रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णसंख्ये आणखीन घट झाली पाहिजे. धारावीत शून्य रुग्णवाढ असून वरळीत काल एकच रुग्ण सापडला. म्हणजेच मुंबईत कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसतोय. त्यामुळे रुग्णसंख्या कमी झाली की विचार करु, त्यानंतर सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवासास परवानगी देण्याचा विचार करावाच लागेल. पण इतरांच्या जीवावर बेतेल अशा पद्धतीने ना महापालिका वागणार ना राज्य सरकार, असंही महापौरांनी स्पष्ट केलं आहे. हेही वाचा- मोठी बातमी: उद्या शरद पवारांच्या निवासस्थानी 15 पक्षांची महत्त्वाची बैठक मुंबई पालिका आयुक्त काय म्हणाले दरम्यान मुंबई संसर्ग दरात पहिल्या स्तरात आणि ऑक्सिजन बेड्सच्या प्रमाणात दुसऱ्या स्तरात येत आहे. असं असलं तरी, मुंबईत सध्या तरी तिसऱ्या स्तरातील निर्बंध कायम राहणार असल्याचं मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितलं. तसंच सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु करण्यावरही टप्प्याटप्प्यानं निर्णय घेण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. लोकल सेवा टप्प्याटप्प्यानं सुरु करण्यात येईल. त्यात आधी महिलांसाठी लोकल सेवा सुरु करू त्यानंतर इतरांचा विचार केला जाईल. यामुळे लोकलमध्ये गर्दी होणार नाही. मात्र तत्पूर्वी मुंबई शहर दुसऱ्या टप्प्यात येण्यासाठी परिस्थितीत आणखी सुधारणा होण्याची गरज आहे आणि त्यानंतरच लोकल सेवेसंदर्भातले निर्णय घेण्यात येतील, असे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितलं. हेही वाचा- प्रियंका गांधींनी केले 'त्या' 50 नेत्यांना फोन, दिला महत्त्वाचा निरोप मुंबई सध्या पहिल्या स्तरात आली असली तरी येत्या दोन ते तीन आठवड्यात तिसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य मंत्रालयाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी पालिकेकडून आराखडा तयार केला जात आहे. म्हणूनच शहरातील रुग्णसंख्या कमी झाली असली तरी सर्व निर्बंध शिथील करुन सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु करणं धोकादायक ठरु शकतो, असं अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हटलं आहे. पालिकेकडून सावध पावलं उचलली जात आहे. शहरातील रुग्णसंख्येत घट झाली असल्यानं पुढच्या आठवड्यासाठी काही निर्बंध शिथील करण्यावर येत्या दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असं सुरेश काकाणी यांनी सांगितलं.
    Published by:Pooja Vichare
    First published: