• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • आर्यन खान न्यायालयाच्या 'त्या' अटीचं करतोय का पालन?, अरबाज मर्चंटच्या वडिलांनी दिली माहिती

आर्यन खान न्यायालयाच्या 'त्या' अटीचं करतोय का पालन?, अरबाज मर्चंटच्या वडिलांनी दिली माहिती

मुंबई उच्च न्यायालयानं (Bombay High Court) त्याला जामीन दिला आहे. मात्र याचबरोबर काही कठोर अटी देखील घातल्या. या अटींचं पालन करणं बंधनकारक असतं.

  • Share this:
    मुंबई, 03 नोव्हेंबर: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा (Shah Rukh Khan) आर्यन खान (Aryan Khan) याला मुंबईतल्या क्रूझ ड्रग्ज (Cruise Drug Party) पार्टी प्रकरणात 26 दिवस तुरुंगात राहावं लागलं. 30 ऑक्टोबर अखेर आर्यन खान (Aryan Khan) तुरुंगाबाहेर आला. मुंबई उच्च न्यायालयानं (Bombay High Court) त्याला जामीन दिला आहे. मात्र याचबरोबर काही कठोर अटी देखील घातल्या. या अटींचं पालन करणं बंधनकारक असतं. मात्र आर्यन या अटींचं पाळत करत आहे की नाही याबाबत आता माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आर्यन खान सह त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमून धामेचा या तिघांचा एकाचवेळी जामीन मंजूर झाला. यांचा जामीन अर्ज मंजूर करत असताना न्यायालयानं अनेक अटी नियम घातले. यात तिघांनीही एकमेकांच्या संपर्कात राहायचं नाही, अशी अट न्यायालयानं घातली. यावर अरबाजचे वडील अस्लम मर्चंट यांनी महत्त्वाची माहिती दिली. हेही वाचा- NCB ची पुन्हा धडक कारवाई, विलेपार्लेत पकडले कोट्यवधींचे हेरॉईन या आदेशासंदर्भात अरबाज मर्चंटचे वडील अस्लम मर्चंट म्हणाले, अरबाज माझ्याशी या अटीबाबत बोलला आहे. तो मला म्हणाला की, न्यायालयानं जी अट घातली आहे त्याचं पालन मला करावंचं लागेल. त्या नरकात कोण जाईल. त्यापेक्षा सक्तीनं न्यायालयाचे नियम पाळलेले बरे. नियम न्यायालयाच्या आदेशानुसार अरबाज आणि आर्यन एकमेकांसोबत कुठल्याही पद्धतीने संवाद साधू शकत नाही. दोघांनाही एकमेकांशी कोणत्याही प्रकारे संपर्क करता येणार नाही. हा आदेश आर्यनलादेखील लागू होतो, असं मर्चंट यांनी म्हटलं आहे. हेही वाचा-  किरीट सोमय्यांचा 'फटाका' निघाला फुसका, अजित पवारांच्या वकिलांनी काढली 'वात'!
     पुढे ते सांगतात की, अरबाज हा आर्यनचा जवळचा मित्र आहे आणि आर्यन अडचणीत येईल असं कोणतंही काम तो करणार नाही. म्हणूनच दोघांनीही एकमेकांपासून दूर राहण्याचे ठरवलं आहे.
    अरबाज आणि आर्यन देखील न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसंच न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं उल्लंघन होणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत. त्या दोघांना देखील जामीन अर्ज रद्द झालेला चालणार नाही. नाईलाज असला तरी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावेच लागणार असल्याचं अस्लम मर्चंट म्हणालेत. आर्यनला 1 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मुंबई उच्च न्यायालयानं आर्यन खानला अटी शर्तीसह जामीन मंजूर केला. तीन दिवस सुरु असलेल्या जोरदार युक्तीवादानंतर आर्यनचे वकील मुकुल रोहतगी यांनी जमेची बाजू लावून धरत आर्यन खानला जामीन मिळवून दिला. आर्यनसह अरबाज आणि मुनमून यांची जामिनीवर सुटका झाली. या जामीन अर्जामध्ये अनेक अटींची आर्यनला पालन करावं लागणार आहे. हेही वाचा-  अशोक चव्हाणांना पुन्हा मुख्यमंत्री करणार, काँग्रेस नेत्याचे मोठे विधान
     एकूण 5 पानांची ॲार्डर आहे. 1 लाख रुपयांचा जातमुचलक्यावर प्रत्येकी जामीन मंजूर करण्यात आला आहे. असा गुन्हा परत करू नये, इतर आरोपींशी बोलू नये, साक्षीदारांवर प्रभाव टाकू नये, देश सोडू नये, मीडियाची, सोशल मीडियावर बोलू नये असे नियम घालण्यात आले आहे. त्याचबरोबर ncb ऑफिसमध्ये प्रत्येक शुक्रवारी 11 ते 2 वेळात हजर राहावे लागणार आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published: