मुंबई, 03 नोव्हेंबर: मंगळवारी मुंबईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं (NCB action ) धडक कारवाई केली आहे. एनसीबीनं ही धडक कारवाई विलेपार्ले (Vile Parle area) परिसरात केली आहे. या कारवाईत कोट्यवधींचे हेरॉईन (heroin)जप्त करण्यात आलेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणानंतर एनसीबीनं अंमली पदार्थ तस्करांविरोधात आपली मोठी मोहिम सुरु केली आहे.
मुंबईतील क्रूझ ड्रग्ज कारवाईनंतर चर्चेत आलेल्या एनसीबीनं विलेपार्लेमध्ये पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. एनसीबीनं या कारवाईची माहिती दिली आहे. या कारवाईत कोट्यवधींचे हेरॉईन जप्त केलेत. तसंच या प्रकरणातल्या संशयितांचा एनसीबी पथक शोध घेत आहेत, अशी माहिती एनसीबीनं दिली.
नवी मुंबईतही कारवाई
ऑक्टोबर महिन्यात नवी मुंबईतील न्हावा शेवा बंदरातही एनसीबीनं मोठी कारवाई केली होती. या कारवाईत DRE च्या झोनल युनिटने 25 किलो हेरॉईन जप्त केलं होतं. हेरॉईनचा हा साठा एका कंटेनरमध्ये लपवून ठेवण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 125 कोटी रुपये होती. या कारवाईनंतर एनसीबीनं नवी मुंबईतील एका व्यावसायिकाला देखील अटक केली होती.
NIA कडे सोपवला जाणार मुंबई ड्रग्ज प्रकरणाचा तपास?
मुंबई ड्रग्ज प्रकरणाचा (Mumbai Drugs Bust Case) तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA) सोपवला जाण्याची शक्यता आहे. सीएनएन न्यूज 18 ने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. अहवालानुसार या प्रकरणाची लिंक आंतरराष्ट्रीय रॅकेटशी (International racket) संबंधित असू शकते. या हायप्रोफाईल प्रकरणात मोठा कट आणि देशाला असलेला संभाव्य धोका लक्षात घेऊन तपास एनआयएकडे सोपवला जाण्याची शक्यता आहे. यापूर्वीही मुंबई ड्रग्ज प्रकरणाच्या तपासात अनियमिततेचे अनेक आरोप झाले आहेत.
हेही वाचा- अशोक चव्हाणांना पुन्हा मुख्यमंत्री करणार, काँग्रेस नेत्याचे मोठे विधान
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: NCB