Home /News /mumbai /

Most Forgetful City : सर्वात विसराळू लोकांचं शहर ठरलंय 'आपली मुंबई'! Uber मध्ये काय काय गोष्टी विसरतात मुंबईकर माहीत आहे का?

Most Forgetful City : सर्वात विसराळू लोकांचं शहर ठरलंय 'आपली मुंबई'! Uber मध्ये काय काय गोष्टी विसरतात मुंबईकर माहीत आहे का?

मुंबईमध्ये गर्दी आणि धावपळ जास्त असल्याने काही लोक आपल्या वस्तू वाहनांमध्ये तसेच विसरून जातात. Uber ने प्रवास करणारे लोक आपल्या वस्तू वाहनामध्ये विसरून जातात. (Most forgetful city)

  नवी दिल्ली, 07 जून : मुंबईकरांना लोकलनंतर (Mumbai local) सर्वात जलद दळणवळणासाठी मिळणारी सुविधा म्हणजे उबेरची टॅक्सी (Uber taxi) यामुळे मुंबईतील (Mumbai) लोकांना कधी उशिर झाल्यास उबेरचा जास्त वापर करतात. यादरम्यान मुंबईमध्ये गर्दी आणि धावपळ जास्त असल्याने काही लोक आपल्या वस्तू वाहनांमध्ये तसेच विसरून जातात. Uber ने प्रवास करणारे लोक आपल्या वस्तू वाहनामध्ये विसरून जातात. (Most forgetful city) दरम्यान यामध्ये मुंबईत सर्वात जास्त लोक uber मध्ये आपल्या वस्तू विसरून जात असल्याचे समोर आले आहे.

  टॅक्सी एग्रीगेटर Uber ने Lost and Found Index ची यावर्षातील यादी जाहीर केली आहे. यामध्ये उबेरने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत मुंबई हे देशातील सर्वात विसराळू शहर असल्याचे समोर आले आहे. तर दिल्ली-एनसीआर दुसऱ्या, उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ तिसऱ्या क्रमांकावर आहे. याचबरोबर पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता चौथ्या क्रमांकावर आहे. इंडेक्सच्या माहितीनुसार, लोक अनेकदा वाहनात मिठाई, बासरी, आधार कार्ड, क्रिकेट बॅट्स, स्पाइक गार्ड्स आणि कागदपत्रे यासारख्या अनोख्या वस्तू विसरत असल्याचे समोर आले आहे.

  हे ही वाचा : Monsoon Update : मान्सून कर्नाटकात दाखल तर महाराष्ट्रात येणार कधी? विदर्भात Heat Wave कायम

  मागच्या वर्षी उबेरमध्ये विसरून गेलेल्या यादीत फोन, स्पीकर, हेडफोन, पाकीट आणि पिशव्या या गेल्या याचबरोबर किराणा सामान, थर्मॉस, पाण्याच्या बाटल्या आणि फोन चार्जरही विसरतात. तसेच उबेरमध्ये लोक या वस्तू शक्यतो विसरन नसल्याचेही समोर आले आहे. न चुकणाऱ्या टॉप टेन वस्तूंमध्ये फोन, कॅमेरा, लॅपटॉप, बॅग, लेडीज पर्स, स्पीकर, किराणा, रोख रक्कम, पाण्याच्या बॉटल्स आणि हेडफोन यांचा समावेश आहे.

  हे ही वाचा : Tata ग्रुपच्या 'या' कंपनीमुळे गुंतवणूकदार बनले कोट्यधीश, 17 रुपयांचा शेअर 8600 रुपयांवर

  एक ते तीन वाजण्याच्या दरम्यान लोक विसरतात

  मिळालेल्या माहितीनुसार लोकांनी मार्च महिन्यात उबेरमध्ये जास्त साहित्या विसरून गेल्याचे समोर आले आहे. लोकांनी रविवारी सर्वाधिक कपडे, बुधवारी लॅपटॉप आणि सोमवार आणि शुक्रवारी हेडफोन आणि स्पीकर विसरून गेल्याचे समोर आले आहे. दुपारी एक ते तीनच्या दरम्यान लोकांनी जास्त साहित्य विसरून गेल्याचे समोर आले आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Car, Mumbai, Mumbai local, Mumbai News

  पुढील बातम्या