मुंबई, 7 जून : शेअर बाजारातील गुंतवणुकीत पैसा यापेक्षाही संयम खुप महत्त्वाचा आहे. कारण आज पैसे टाकले आणि डबल झाले पाहिजे या मानसिकतेतून टेडिंग केलं तर अनेकदा नुकसानचं होतं. त्यामुळे अनेक मोठे गुंतवणूकदार लाँग टर्ममध्ये ट्रेड करतात आणि चांगला नफा देखील कमावतात. टाटा समूहाच्या एका कंपनीने (Tata Group Companies) गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. टाटा समूहाची ही कंपनी Tata Elxsi आहे. Tata Elxsi च्या शेअर्सनी गेल्या काही वर्षांमध्ये गुंतवणूकदारांना जवळपास 50,000 टक्के परतावा दिला आहे. या कालावधीत कंपनीचे शेअर्स 17 रुपयांवरून 8600 रुपयांपर्यंत वाढले आहेत. Tata Elxsi च्या शेअर्सनी यावर्षी आतापर्यंत गुंतवणूकदारांना 47 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. कंपनीच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 9,420 रुपये आहे. 1 लाख सुमारे 5 कोटी रुपये झाले Tata Elxsi चे शेअर्स 21 सप्टेंबर 2001 रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर 17.55 रुपयांच्या पातळीवर होते. 6 जून 2022 रोजी कंपनीचे शेअर्स NSE वर 8,680 रुपयांवर बंद झाले आहेत. Tata Elxsi च्या शेअर्सनी या कालावधीत गुंतवणूकदारांना जवळपास 50,000 टक्के परतावा दिला आहे. LIC शेअर होल्डर्सना Paytm ची आठवण; महिनाभरात एक लाख कोटींहून अधिक नुकसान जर एखाद्या व्यक्तीने 21 सप्टेंबर 2001 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या हे पैसे 4.95 कोटी रुपयांच्या जवळपास गेले असते. ‘पोस्टमन काका’ आता जनतेचा ‘आधार’ बनणार; काय आहे UIDAI ची योजना? 5 वर्षांत 1000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला Tata Elxsi च्या शेअर्सनी गेल्या 5 वर्षात गुंतवणूकदारांना 1,027 टक्के परतावा दिला आहे. 9 जून 2017 रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर Tata Elxsi चे शेअर्स 770 रुपयांच्या पातळीवर होते. 6 जून 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 8,680 रुपयांवर बंद झाले. जर एखाद्या व्यक्तीने 9 जून 2017 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्याची गुंतवणूक तशीच ठेवली असती, तर सध्याची रक्कम 11 लाख रुपयांपेक्षा जास्त झाली असती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.