मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुंबईकरांसाठी मोठी बातमी, 'या' महिन्यात मुंबई होऊ शकते अनलॉक'

मुंबईकरांसाठी मोठी बातमी, 'या' महिन्यात मुंबई होऊ शकते अनलॉक'मुंबईत सध्या अनलॉकमुळे अटी काही शिथिल करण्यात आल्या आहे. पण लोकं अजूनही जबाबदारीने वागत नाही.

मुंबईत सध्या अनलॉकमुळे अटी काही शिथिल करण्यात आल्या आहे. पण लोकं अजूनही जबाबदारीने वागत नाही.

मुंबईत सध्या अनलॉकमुळे अटी काही शिथिल करण्यात आल्या आहे. पण लोकं अजूनही जबाबदारीने वागत नाही.

मुंबई, 26 सप्टेंबर : राज्यात कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. राज्याची राजधानी मुंबईला कोरोनाचा विळखा बसला आहे. मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. पण मुंबईत आता कोरोनाची दुसरी लाट येणार नाही. मुंबईकरांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केल्यास फेब्रुवारी 2021 पर्यंत मुंबई पूर्णपणे अनलॉक करता येईल, असा दिलासादायक दावा  पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केला आहे.

दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 सप्टेंबरपासून  दररोज सरासरी दोन हजारांहून अधिकने वाढत आहे. पण, याआधी जेव्हा 7 हजार चाचण्या करण्यात येत होत्या. तेव्हा 1100 कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत होते. आता 15 हजार चाचण्या केल्यावर 2  हजार रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे ही कोरोनाची दुसरी लाट नाही, चाचण्यांचे प्रमाण केल्यामुळे रुग्णवाढ दिसत आहे, असंही चहल यांनी सांगितले.

मासे खायला आवडतात? मग जाणून घ्या त्यांचे 5 फायदे

तसंच, मुंबईत गेल्या महिन्याभरात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण 2.2 टक्क्यांनी कमी झाले आहे. सध्या मुंबईत मृत्यूचे प्रमाण हे 4.5 टक्क्यांवर आहे. कोरोनाबाधित रुग्णांना योग्य आरोग्य सुविधा देण्यासाठी पालिका सक्षम आहे, असंही चहल यांनी स्पष्ट केले.

त्याचरोबर मुंबईत आता हळूहळू  जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मुंबईत जीम आणि रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी चर्चा सुरू आहे. धार्मिक स्थळे सुरू करण्याबद्दलही चर्चा सुरू आहे, याबद्दल लवकरच निर्णय घेतला जाईल, असंही आयुक्तांनी स्पष्ट केले.

कांदा निर्यातबंदीतून पाकचा आर्थिक लाभ हा एक घोटाळाच, शिवसेनेचा मोदींवर निशाणा

मुंबईत सध्या अनलॉकमुळे अटी काही शिथिल करण्यात आल्या आहे. पण लोकं अजूनही जबाबदारीने वागत नाही. अनेक ठिकाणी लोकं मास्क न घालताच वावरत असून हे अत्यंत चिंताजनक आहे. मुंबई कोरोनाला हद्दपार करण्यासाठी  नागरिकांनीही जबाबदारीने वागण्याचे गरजेचं आहे. जर मुंबईकरांनी काटेकोरपणे नियमांचे पालन केले, मास्क वापरला तर लवकरच कोरोनावर नियंत्रण मिळवले जाऊ शकते. जर असे झाले तर फेब्रुवारी 2021 पर्यंत मुंबई पूर्णपणे अनलॉक करता येईल, असंही चहल यांनी सांगितले.

First published:
top videos