मासे खायला आवडतात? मग जाणून घ्या त्यांचे 5 फायदे

मासे खायला आवडतात? मग जाणून घ्या त्यांचे 5 फायदे

आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक असणाऱ्या माशांचे इतर देखील फायदे आहेत. त्यामुळे आज आपण या गोष्टींविषयी जाणून घेणार आहोत.

  • Share this:

मुंबई, 26 सप्टेंबर: भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतात मोठ्या प्रमाणात शाकाहारी लोक आहेत. मात्र मोठ्या संख्येने मांसाहारी नागरिक देखील असून चिकन, मटण आणि मासे मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. या सर्व पदार्थांमध्ये असलेले पौष्टिक घटक शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत. यामध्ये मासा खूपच पौष्टिक असून यामधून तुम्हाला मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि प्रोटिन्स मिळतात.

आसाम, पश्चिम बंगाल, गोवा, तमिळनाडू, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मासे खाल्ले जातात. आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक असणाऱ्या माशांचे इतर देखील फायदे आहेत. त्यामुळे आज आपण या गोष्टींविषयी जाणून घेणार आहोत.

1)फॅटच्या दृष्टीने महत्त्वाचे

आपलं दररोजचं जेवण हे संतुलित असतंच असं नाही.माशांमधून तुम्हाला मोठ्या प्रमाणात फॅट्स मिळतात. मात्र हे फॅट्स घातक नसून आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहेत. साल्मन, ट्राउट, ट्यूना, मॅकरेल, सार्डीन असे मासे खाल्ल्याने आपल्याला मोठ्या प्रमाणात फॅट्स मिळतात.

2) नैराश्यावर उपाय

आजच्या या धावपळीच्या जीवनात नैराश्य हा खूप मोठा आजार झाला आहे. अनेकजण नैराश्येत येऊन चुकीचे पाऊल उचलत असतात. मात्र नियमित मासे खाणाऱ्या मंडळींना नैराश्य येण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. माशांमध्ये ओमेगा थ्री फॅटी असिड असतं त्याचाही उपयोग होतो.

3) गंभीर आजारांपासून संरक्षण

नियमित मासे खाल्ल्यास तुमचं शरीर संतुलित राहतं. त्यामुळे डायबेटीस आणि रक्तदाबासारख्या आजारांपासून तुमचे संरक्षण होण्यास मदत होते. त्याचबरोबर शरीराच्या विविध अवयवांवरदेखील माशांच्या सेवनाचा उत्तम प्रभाव पडत असतो. त्यामुळे तुम्ही आठवड्यातून दोन दिवस मासे खाल्ल्यास तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल.

4) हृदयासाठी फायदेशीर

हल्ली अनेकांना हृदययविकारचा आजार असतो. त्यामुळे झटका येऊन मृत्यु होणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. मात्र मासे हे आरोग्याच्या दृष्टीने आणि खासकरून हृदयासाठी अतिशय हेल्दी असल्याचं समोर आलं आहे. नियमित मासे खाणाऱ्यांना हृदयरोग, हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्याचा धोका तुलनेने कमी असल्याचं देखील सिद्ध झालं आहे.

5) व्हिटॅमिन डी चा खजाना

मासे हे व्हिटॅमिन डी चा खजिना आहेत. विविध जातींच्या माशांमध्ये व्हिटॅमिन डी आढळून येतं. व्हिटॅमिन डी तसंच ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हे लहान मुलांमधील टाईप वन डायबेटीससारख्या आजारांवर फायदेशीर असतं आणि माशांमध्ये ते मिळतं. त्यामुळे दररोज मासे खाल्ल्यास तुम्हाला व्हिटॅमिन डी ची कमी जाणवणार नाही.

Published by: Priyanka Gawde
First published: September 26, 2020, 10:21 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading