मुंबई, 13 एप्रिल : मुंबईत (Mumbai) कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची (Covid - 19) संख्या व मृत्यू एकट्या मुंबईत आहेत. आतापर्यंत मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 1549पर्यंत पोहोचली असून आतापर्यंत येथे 100 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मुंबईत लोक दाटीवाटीने राहतात. त्यातही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत रुग्ण आढळल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे. येथे झपाट्याने रुग्णसंख्या वाढत असून ती 42 च्या पुढे गेली आहे. त्यानंतर वरळीतही रुग्णांची संख्या वाढत आहे. आज आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत आज एकूण 150 नवीन रुग्ण दाखल करण्यात आले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये 6 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये सर्वात कमी म्हणजे 42 वर्षीय व्यक्ती व सर्वाधिक 82 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय आज मुंबईतून 43 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत एकूण 141 जण बरे होऊन घरी गेले आहेत. देशाची आकडेवारी पाहिली तर गेल्या 24 तासांमध्ये 51 जणांचा मृत्यू झाला. ही आत्तापर्यंतची सर्वात जास्त संख्या आहे. तर कोरोना रुग्णांची सख्या 9352 वर पोहोचली आहे तर मृत्यूची संख्या 324 वर गेली आहे. 8048 रुग्ण उपचार घेत असून 979 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यात 72 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. संबंधित - कोरोनाचा उद्रेक : 24 तासांमध्ये 51 मृत्यू, आत्तापर्यंतची सर्वाधिक संख्या नवी मुंबईत कोरोनाचा कहर 12 तासांमध्ये आढळले 11 रुग्ण लॉकडाऊनदरम्यान 1600 किमी अंतर चालत पोहोचला घरी, आई-भावाने दारंच उघडलं नाही संपादन - मीनल गांगुर्डे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







