लॉकडाऊनदरम्यान 1600 किमी अंतर चालत पोहोचला घरी, आई-भावाने दारंच उघडलं नाही

लॉकडाऊनदरम्यान 1600 किमी अंतर चालत पोहोचला घरी, आई-भावाने दारंच उघडलं नाही

कुटुंबीयांसाठी हा तरुण मुंबईत राहून काम करत होता. जे पैसे मिळतील ते घरी पाठवायचा. मात्र सध्या या तरुणाला कुटुंबाचा दुरावा सहन करावा लागत आहे

  • Share this:

मुंबई, 13 एप्रिल : देशभरात कोरोनाचा (Coronavirus) कहर वाढत चालला आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या (Covid - 19) वाढत्या संख्येमुळे लॉक़डाऊन – 2 लागू केलं आहे. अशा परिस्थिती अनेक मजूर शहरांमधून आपल्या गावी जाण्यासाठी पायीच निघाले होते. मात्र इतकं मोठं संकट ओलांडल्यानंतरही त्यांच्या वाट्याला दु:खच आलं आहे.

एक तरुण मुंबईतील नागपाडा भागात काम करत होता. लॉकडाऊनदरम्यान वाहतूक व्यवस्था नसल्याने तो पायीच त्याच्या घरी वाराणसीला जायला निघाला. यावेळी त्याच्यासोबत काही कामावरील मित्रही होते. त्या सर्वांची 1600 किमी अंतर पायी चालण्याची तयारी होती. रेल्वे ट्रॅक, रस्त्यावरुन अखेर तो घरी पोहोचला. तेथे पोहोचल्यावर त्याने आईला फोन करुन आल्याचे सांगितले. मात्र आईने घराचा दरवाजा उघडलाच नाही. याशिवाय त्यांचा भाऊ व वहिनीनेही दराचा दरवाजा बंदच ठेवला.

यापूर्वी तरुणाचा चाचणी झाली होती. याशिवाय त्याला 14 दिवस क्वारंटाइन राहण्यास सांगितलं होतं. मात्र त्यादरम्यान तो वाराणसीला निघाला. सध्या या तरुणाला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असली तरी त्याला थकवा जाणवत आहे.

या तरुणाला किंवा त्याच्यासोबत आलेल्या इतरांना कोरोनाची लागण झाली असल्याचे येथील गावकऱ्यांना वाटत आहे. 'आम्ही प्रथम या तरुणाला जिल्हा रुग्णालयात घेऊन गेलो तेथे त्याची चाचणी केली. त्यानंतर आम्ही याला घरी घेऊन गेलो, मात्र घरातल्यांनी त्याला घरात घेण्यास नकार दिला', अशी माहिती कोतवाली ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश पांडेय यांनी दिली आहे. घरात घेतलं नाही तरी याची सोय सुरक्षित ठिकाणी करण्यात येईल, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

मुंबईत काम करुन तो तरुण जे पैसे मिळत ते गावी पाठवत. आईसाठी आणि वहिनीसाठी अनेकदा त्याने पैसे पाठवले आहे. तो घराकडे चालत निघाला तेव्हा त्याने फार पैसे खर्च केले नाही. घरी देण्यासाठी म्हणून त्याने पैसे जपून ठेवले, मात्र कुटुंबीयांनीच त्याला घरात घेतलं नाही.

संबंधित -

Coronavirus : ‘या’ देशातील घरांमधून काढले तब्बल 800 मृतदेह, अधिकारी हादरले

कोरोनाविरुद्ध जिंकला पण समाजाने हरवलं, इंजिनिअरला घ्यावा लागला घर विकायचा निर्णय

First published: April 13, 2020, 6:23 PM IST

ताज्या बातम्या