नवी मुंबई 13 एप्रिल : कोरोना बाधित रुग्णांचा धक्कादायक आकडा समोर आला आहे. गेल्या 12 तासांमध्ये तब्बल 11 कोरोना बाधित रुग्ण आढळले. एका दिवसात रुग्ण आढळण्याचा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. त्यामुळे नवी मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 50 वर गेला आहे. यात बेलापूर 6, नेरुळ 2, वाशी 2 आणि कोपरखैरणे 1 असे रुग्ण आढळले. नवी मुंबईच्या वाढत्या कोरोना बाधित रुग्णांमुळे चिंतेत वाढ झाली आहे.
रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. आज राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. राज्यात एकूण संख्याही तब्बल 2064 वर पोहोचली आहे.
राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 82 नवे रुग्ण आढळले आहे. यात सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळले आहे. एकटा मुंबईत 82 पैकी 59 रुग्ण आढळले आहे. यात धारावी, कोळीवाडा परिसराचा समावेश आहे. त्यापाठोपाठ मालेगावमध्येही 12 रुग्ण आढळले आहे. मालेगावमध्ये गेल्या 48 तासांत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे.
हेही वाचा -खूशखबर! आता 90 दिवसांत कोरोनावर लस मिळणार, 'या' देशाने केला दावा
त्यामुळे मुंबई पाठोपाठ मालेगावही कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरत असल्याचं चित्र आहे. रविवारपर्यंत मालेगावमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा हा 31 वर होता. त्यातच गेल्या 24 तासांत 12 जणांची आणखी भर पडली आहे. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले असून तातडीने प्रतिबंध घालण्यासाठी पावलं उचणार आहे.
देशभर कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. कोरोना रुग्णांची सख्या 9 हजारांवर पोहोचली आहे तर मृत्यूची संख्या 308 वर गेली आहे. मात्र देशात कोरोनाच्या उद्रेकाची सर्वोच्च स्थिती अजूनही आलेली नाही अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली. कोरोनाग्रस्तांची संख्या 9,152वर गेलीय तर गेल्या 24 तासांमध्ये 35 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 856 जण बरे झाले असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यात 72 विदेशी नागरिकांचा समावेश असल्याचंही त्यांनी सांगितलं.
लॉकडाऊनदरम्यान 1600 किमी अंतर चालत पोहोचला घरी, आई-भावाने दारंच उघडलं नाही
चीन, अमेरिका, इटली, स्पेन, ब्रिटन या देशांमध्ये जसा कोरोनाचा उद्रेक झाला तसा उद्रेक भारतात होईल का याबाबात भीती व्यक्त केली जात होती. मात्र लॉकडाऊन आणि सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोनाला रोखण्यात मोठ्या प्रमाणात यश आल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं.