कोरोनाचा उद्रेक : 24 तासांमध्ये 51 मृत्यू, आत्तापर्यंतची सर्वाधिक संख्या

कोरोनाचा उद्रेक : 24 तासांमध्ये 51 मृत्यू, आत्तापर्यंतची सर्वाधिक संख्या

मात्र देशात कोरोनाच्या उद्रेकाची सर्वोच्च स्थिती अजूनही आलेली नाही अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 13 एप्रिल : देशभर कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. गेल्या 24 तासांमध्ये 51 जणांचा मृत्यू झाला. ही आत्तापर्यंतची सर्वात जास्त संख्या आहे. तर कोरोना रुग्णांची सख्या 9352 वर पोहोचली आहे तर मृत्यूची संख्या 324 वर गेली आहे. 8048 रुग्ण उपचार घेत असून 979 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यात 72 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. मात्र देशात कोरोनाच्या उद्रेकाची सर्वोच्च स्थिती अजूनही आलेली नाही अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली.

आत्तापर्यंत 2,06,212 कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यात 857 नवे रुग्ण सापडले. मात्र अशाही परिस्थितीत काही सकारात्मक घटना घडत आहेत. देशातल्या 25 राज्यांमधल्या काही जिल्ह्यांना कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश मिळालं असून त्यात महाराष्ट्रातल्या गोंदिया या जिल्ह्याचा समावेश आहे.

केंद्रीय पातळीवर याची दखल घेण्यात आली आहे. या जिल्ह्यांमध्ये पूर्वी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. मात्र जिल्हा प्रशासनाने जे उपाय केले त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखला गेला. चीनमधून ज्या कोरोना किट मागविण्यात आल्या होत्या त्या दोन दिवसांमध्ये भारतात येतील अशी माहिती ICMRचे शास्त्रज्ञ रमण गंगाखेडकर यांनी दिली.

लॉकडाऊनदरम्यान 1600 किमी अंतर चालत पोहोचला घरी, आई-भावाने दारंच उघडलं नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज संध्याकाळी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी यांच्यासोबत व्हिडीयो काँफरसिंगद्वारे बैठक घेणार आहेत. या बैठकीत लॉकडाऊनच्या काळात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनां सदर्भात महत्वाची चर्चा होणार आहे.

महाराष्ट्रात 15 एप्रिल ते 20 एप्रिल या काळात कोरोना संसर्ग झालेले रुग्ण मोठ्या संख्येने बाहेर येतील अशी तज्ञांची माहिती आहे. त्यामुळे या दिवसांत शहरी भागात लाँकडाऊनचे निर्बंध आणखी कडक करण्याची शक्यता आहे. तसेच ग्रामीण महाराष्ट्रात लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल करण्यासंदर्भातही चर्चा होणार आहे.

कोरोनाविरुद्ध जिंकला पण समाजाने हरवलं, इंजिनिअरला घ्यावा लागला घर विकायचा निर्णय

देशभरातील लॉकडाऊन आता टप्प्याटप्प्याने काढण्यात येईल, अशी माहिती आहे. सरकार काही आर्थिक क्रिया सुरू करण्यासाठी सूट देण्याच्या विचारात असल्याने लॉकडाऊन 2.0 कडे संपूर्ण लॉकडाउन म्हणून पाहिले जाऊ शकत नाही, असे सरकारी सूत्रांनी सोमवारी सांगितले.

First published: April 13, 2020, 7:19 PM IST

ताज्या बातम्या