Home /News /maharashtra /

अनिल देशमुखांच्या अडचणीत अधिकच वाढ, दोन सहकाऱ्यांवर आरोपपत्र दाखल

अनिल देशमुखांच्या अडचणीत अधिकच वाढ, दोन सहकाऱ्यांवर आरोपपत्र दाखल

मनी लॉंडरिंग प्रकरणात अनिल देशमुख यांचे सहकारी कुंदन शिंदे (Kundan Shinde) आणि संजीव पालांडे (Sanjeev Palande) यांच्याविरोधात ईडीनं (ED) आरोपपत्र (Charge sheet) दाखल केलं आहे.

    मुंबई, 23 ऑगस्ट : आर्थिक अफरातफर (money laundering) आणि गैरव्यवहार प्रकरणात अडकलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री (ex home minister) अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणी (problems) दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. आतापर्यंत 5 वेळा समन्स बजावूनही अनिल देशमुख हे ईडीच्या चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. आता मनी लॉंडरिंग प्रकरणात अनिल देशमुख यांचे सहकारी कुंदन शिंदे (Kundan Shinde) आणि संजीव पालांडे (Sanjeev Palande) यांच्याविरोधात ईडीनं (ED) आरोपपत्र (Charge sheet) दाखल केलं आहे. त्यामुळे देशमुखांच्या अडचणीत अधिकच भर पडणार आहे. मुदत उलटल्याने आरोपपत्र कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. 25 जून रोजी या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सुरुवातीला त्यांना ईडीच्या कोठडीत ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. गेल्या दोन महिन्यांपासून हे दोघं तुरुंगात आहेत. ईडीच्या नियमानुसार अटक झाल्यानंतर 60 दिवसांत आरोपपत्र दाखल करणं अनिवार्य असतं. त्यानुसार आता या दोघांवर आरोपपत्र दाखल करण्याचा निर्णय ईडीनं घेतला आहे. आरोपपत्रात महत्त्वाचे पुरावे या आरोपपत्रात कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांच्याविरोधात महत्त्वाचे पुरावे असल्याची माहिती मिळत आहे. बार मालकांचा जवाब, सचिन वाझेचा जबाब, इतर बोगस कंपन्यांबाबतचे पुरावे आणि अनिल देशमुख यांच्या संस्थेत आलेल्या पैशांचे पुरावे या आरोपपत्रात असल्याचं सांगितलं जात आहे. हे वाचा -बांगड्या विकणाऱ्या तरुणाच्या मारहाणीनंतर वाद पेटला,काँग्रेस नेत्याकडून VIDEOशेअर अनिल देशमुख चौकशीसाठी गैरहजर ईडीकडून पाच वेळा समन्स बजावूनही अनिल देशमुख चौकशीला हजर झालेले नाहीत. न्यायालयीन चौकशी संपल्याशिवाय आपण ईडीच्या चौकशीला सामोरे न जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी एक पत्रक काढून जाहीर केलं आहे. ईडीच्या कारवाईविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले असून तिथं आपल्याला कनिष्ठ न्यायालयात जाण्याची परवानगी मिळाली असल्याचं देशमुखांनी म्हटलं आहे. न्यायालयातील निर्णय झाल्यानंतर आपण स्वतः ईडीसमोर चौकशीसाठी हजर होऊ, असं देशमुखांनी म्हटलं आहे.

    तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

    Published by:desk news
    First published:

    Tags: Anil deshmukh, ED

    पुढील बातम्या