जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / मुंबईतल्या 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशन संदर्भातली मोठी बातमी, येणार नवे निर्बंध

मुंबईतल्या 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशन संदर्भातली मोठी बातमी, येणार नवे निर्बंध

सांकेतिक फोटो

सांकेतिक फोटो

मुंबईतही ओमायक्रॉन व्हेरिएंट कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेनं (Mumbai Municipal Corporation) मोठा निर्णय घेतला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 28 डिसेंबर: कोरोनाच्या ओमायक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरिएंटनं (new variant of the corona) चिंता वाढवली आहे. त्यामुळे राज्य सरकार (Maharashtra Government)नं सावध पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. नाताळ सण (Christmas) आणि ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आजपासून रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदी असणार आहे. त्यानंतर मुंबईतही ओमायक्रॉन व्हेरिएंट कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेनं (Mumbai Municipal Corporation) मोठा निर्णय घेतला. मुंबईकरांना यंदाही थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन मुंबईत करता येणार नाही आहे. मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन मुंबईत करता येणार नसल्याचं सुरेश काकाणी यांनी सांगितलं आहे. हेही वाचा-  BREAKING : राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या गाडीवर हल्ला, अज्ञातांकडून दगडफेक तसंच 31 डिसेंबरपर्यंत मुंबईत जितके नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून येतील त्यांचे सर्वांचे जीनोम सिक्वेन्सिंग केलं जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. या निर्णयामुळे जीनोम सिक्वेन्सिंगद्वरे मुंबईतल्या कोरोना रुग्ण वाढीच कारण ओमायक्रॉन आहे का हे या चाचणीतून कळेल, असं सुरेश काकाणी म्हणालेत. मुंबई शहरासाठी दोन दिवसांपूर्वी नवी नियमावली जाहीर करण्यात आली. या नव्या नियमावलीमुळे कोरोना रुग्णांचं प्रमाण कमी नाही झालं तर निर्बंध आणखीन कठोर करण्यात येणार असल्याचंही काकाणी यांनी सांगितलंय. दोन दिवसांपूर्वी BMC आयुक्तांनी जारी केले आदेश; हे आहेत नवे नियम कोविड-19 ची वाढती प्रकरणे लक्षात घेता, मुंबई महानगरपालिका आयुक्त (BMC commissioner) यांनी नवीन वर्षाच्या पार्टीवर बंदी घालणारा आदेश जारी केला आहे. यामध्ये खुल्या किंवा बंद ठिकाणी लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. हा आदेश 25 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 पासून लागू करण्यात आला आहे. हेही वाचा-   BREAKING : ‘कायदे तपासण्याचा अधिकार तुम्हाला नाही’, मुख्यमंत्र्यांचं राज्यपालांना खरमरीत पत्र

 बीएमसी आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्या आदेशानुसार, कोरोनाबाबतच्या या आदेशांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर आयपीसी कलम आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल. हा नवा आदेश राज्य सरकारच्या आदेशाव्यतिरिक्त आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात