मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BREAKING : राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या गाडीवर हल्ला, अज्ञातांकडून दगडफेक

BREAKING : राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या गाडीवर हल्ला, अज्ञातांकडून दगडफेक

 राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या फॉर्च्युनर गाडीवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या फॉर्च्युनर गाडीवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या फॉर्च्युनर गाडीवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे.

  • Published by:  sachin Salve
इम्तियाज अली, प्रतिनिधी मुक्ताईनगर, 27 डिसेंबर :  मुक्ताईनगर मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (shivsena) आणि राष्ट्रवादी (ncp) पदाधिकाऱ्यांमध्ये संघर्ष चालू असून त्यातच आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांच्या कन्या रोहिणी खडसे (rohini khadse) खेवलकर यांच्या वाहनावर अज्ञात इसमाने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहिणी खडसे या मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव इथं विवाहाच्या निमित्ताने हळदीच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. हळदीचा कार्यक्रम आटोपून त्या घरी परत येत होत्या. रोहिणी खडसे या आपल्या फॉर्च्युनर गाडीने येत असताना अचानक काही इसमांनी हल्ला केला. रोहिणी खडसे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. अचानक झालेल्या दगडफेकीनंतर एकच गोंधळ उडाला. या घटनेनंतर खडसे समर्थकांची घराजवळ गर्दी जमली असून वातावरण तापले आहे. दरम्यान, रोहिणी खडसे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याची राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करून तीव्र निषेध केला आहे. 'रोहिणी खडसे यांच्या गाडीवर थोड्या वेळापुर्वी प्राणघातक हल्ला हल्लेखोरांनी केला,एक महिला सक्षमपणे मतदारसंघात काम करीत असताना असे भ्याड हल्ले करणारे निर्दोष सुटता कामा नये, मग ते कोणीही असो. जळगाव पोलीस अधीक्षकांनी तातडीने हल्लेखोरांचा तपास करुन कडक कारवाई करावी' अशी मागणी चाकणकर यांनी केली.
First published:

पुढील बातम्या