जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / मोठी बातमी! प्रेग्नंट, ब्रेस्टफिडिंग करणाऱ्या महिलांनाही मिळणार कोरोना लस; पण एक अट

मोठी बातमी! प्रेग्नंट, ब्रेस्टफिडिंग करणाऱ्या महिलांनाही मिळणार कोरोना लस; पण एक अट

आधी एका मुलाला जन्म दिला नंतर तिला जुळ्या मुली झाला.

आधी एका मुलाला जन्म दिला नंतर तिला जुळ्या मुली झाला.

गरोदर आणि स्तनपान देणाऱ्या महिलांच्या कोरोना लसीकरणाबाबत बीएमसीने (BMC) एक नियम जारी केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 24 मे : देशात जेव्हापासून लसीकरण (Corona vaccination) सुरू झालेलं आहे तेव्हापासून गरोदर माता (Corona vaccine to pregnant woman) आणि स्तनपान करणार्‍या माता यांना लसीकरण  (Corona vaccine to breastfeeding woman) केलं जावं अथवा जाऊ नये याबद्दल तज्ञांमध्ये मतांतर होती. परंतु आता मात्र केंद्र शासनाने याबाबतचे मार्गदर्शक तत्व जाहीर केली आहेत. त्यानुसार आता गरोदर असलेल्या महिला आणि स्तनपान देणाऱ्या लहान बाळांच्या माता यांनासुद्धा लसीकरण सुरू केलं जाणार आहे. मुंबई महापालिकेने (BMC) सुद्धा या वर्गातील महिलांना लसीकरण (Mumbai corona vaccination) सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. मुंबईत येत्या दोन दिवसात गरोदर असलेल्या महिला आणि स्तनपान देणाऱ्या लहान बाळांच्या माता यांनासुद्धा लसीकरण सुरू केलं जाणार आहे. आतापर्यंत या महिलांविषयक धोरण निश्चित करण्यात आलेलं नव्हतं. आता मात्र या महिला त्यांची ट्रीटमेंट सुरू असलेल्या डॉक्टरांचं सर्टिफिकेट घेऊन लस घेऊ शकतात. जेणेकरून कुठल्याही पद्धतीची अॅलर्जी या महिलांना होणार नाही याची काळजी घेता येईल. आज किंवा उद्या याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. हे वाचा -  Black, White नंतर Yellow Fungus, आणखी एक भयंकर फंगल इन्फेक्शन; अशी आहेत लक्षणं अशा मातांना जास्त कालावधी थांबावं लागू नये म्हणून वॉक इन सुविधा दिली जाणार आहे. तसंच या महिलांनी फार लांब न जाता जवळ असलेल्या लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावं असं आवाहन मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे. बीएमसीची कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी तर दुसरीकडे महापालिकेने तिसऱ्या लाटेची तयारी सुरू केली आहे. मुंबईत 5 नवीन जंबो covid  सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. 5,500 हजार बेडची या जंबो सेंटरची क्षमता असेल. येत्या दीड महिन्यात हे सेंटर तयार होईल.‌ काही लहान मुलांच्या रुग्णालयात, मेटरनिटी होम, यातही लहान मुलांसाठी वॉर्ड सुरू करत आहोत. जंबोमध्ये पण आम्ही 100 बेड प्रत्येक  ठिकाणी राखीव करणार आहोत.आम्ही वयानुसार लहान मुलांचे 6 गट तयार केले आहेत. त्यानुसार मुलांबरोबर आई वडीलपैकी कुणी पॉझिटिव्ह असेल किंवा नसेल तर काय व्यवस्था करता येते ते पाहणार आहोत, असं सुरेश काकाणी यांनी सांगितलं. हे वाचा -  Vaccination मोठी बातमी! आता ऑनलाईन रजिस्टर न करता 18 ते 44 वयोगटालाही मिळणार लस मुंबईत सध्या म्युकोरमायकोसिसचे दीडशे रुग्ण आहेत या रुग्णांना लागणाऱ्या औषधांचा पुरेसा साठा महापालिकेकडे आहे. महापालिकेने खाजगी रुग्णालयासाठी एक हेल्पलाइन नंबर सुरू केला आहे. खाजगी रुग्णालयांनी नागरिकांना प्रिस्क्रिप्शन लिहून न देता या गटाकडे औषधांची मागणी करावी, औषधे पुरवली जातील, असं काकाणी म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात