विजय वंजारा (मुंबई), 31 जानेवारी : मुंबईतील बोरिवली पूर्व कस्तुरबा पोलिसांनी बुलेट चोर बंटी बबलीला अटक केली आहे. जे फक्त बुलेट बाईक चोरायचे. नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत या बुलेट चोरांनी कस्तुरबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 3 बुलेट चोरल्या असून चौथी बुलेट चोरी होण्यापूर्वीच कस्तुरबा पोलिसांनी चोरट्यांना रंगेहाथ पकडले आहे.
या बुलेट चोर बंटी बबलीकडून 3 बुलेट दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. नाशिकच्या ओझर गावात चोरट्यांनी चोरी करून 25 हजार रुपयांना विकले होते. कागदाशिवाय बुलेट बाईक विकत घेणाऱ्या बुलेट खरेदीदारालाही कस्तुरबा पोलिसांनी अटक केली आहे.
हे ही वाचा : कोळसा मंत्र्यांच्या नावाने 1 कोटीची खंडणी, नागपुरातील धक्कादायक प्रकारसमोर
कस्तुरबा पोलीस ठाण्यातून बुलेट बाईक चोरीच्या घटनेत पोलिसांना सीसीटीव्हीत चोरटे दिसत असले तरी त्यांची ओळख पटू शकली नाही. कस्तुरबा पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे सापळा रचून चौथी बुलेट चोरण्यापूर्वी बंटी आणि बबलीला अटक केली. या बुलेट चोराच नाव महेश भालचंद्र खापरे (वय 27) असून तो मुराबाद ठाणे येथील रहिवासी आहे. याशिवाय वाशिंद, इगतपुरी आणि बदलापूरमध्ये दुचाकी चोरीचे 5 गुन्हे दाखल झाले आहेत.
ज्याचे आरोपी 15 महिने तुरुंगात राहिल्यानंतर बाहेर आले. हा आरोपी इतका हुशार आहे की बुलेट दुचाकी चोरण्यासाठी त्याला फक्त 5 मिनिटे लागतात. कस्तुरबा पोलिसांनी आरोपी सकिनाबानो मोहम्मद अनीस गोसी (22) आणि दुचाकी खरेदीदार ललित किसन पवार (19) यांनाही अटक केली आहे.
हे ही वाचा : बँकेच्या माजी अध्यक्षाच्या घरी ED सापडलं घबाड, 2 कोटींचे हिरे, 4 आलिशान कार आणि बरंच काही..
बुलेट चोरल्यानंतर ही तरुणी पोलिसांपासून वाचण्यासाठी मागे बसून चेकपोस्ट ओलांडायची. एवढेच नाही तर सकिनाबानोसोबत त्याला लग्न करायचे असल्याने बुलेट दुचाकी चोरायचा असे सांगण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Mumbai, Mumbai case, Mumbai News, Mumbai police