लस आहे पण लसीकरण मोहीम ठप्प! मुंबई मनपा आयुक्तांच्या निर्णयाचा असाही परिणाम

लस आहे पण लसीकरण मोहीम ठप्प! मुंबई मनपा आयुक्तांच्या निर्णयाचा असाही परिणाम

मुंबईतून दररोज अशा बातम्या समोर येत होत्या की, मुंबईतील बड्या बड्या लसीकरण केंद्रावरील (Mumbai Vaccination Centers) लशींचा साठा (Shortage of Corona Vaccine) संपला आहे. मात्र आता लस उपलब्ध असूनही पालिकेच्या लसीकरण केंद्रावर एक वेगळा गोंधळ पाहायला मिळाला.

  • Share this:

मुंबई, 07 मे: गेले काही दिवस मुंबईतून दररोज अशा बातम्या समोर येत होत्या की, मुंबईतील बड्या बड्या लसीकरण केंद्रावरील (Mumbai Vaccination Centers) लशींचा साठा (Shortage of Corona Vaccine) संपला आहे. मात्र आता लस उपलब्ध असूनही पालिकेच्या लसीकरण केंद्रावर एक वेगळा गोंधळ पाहायला मिळाला. महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी केवळ नोंदणी केलेल्या नागरिकांनाच लसीकरण केले जाईल अशी भूमिका काल जाहीर केली. याबाबतचे परिपत्रक काढून हे परिपत्रक सर्व लसीकरण केंद्रांना पाठवण्यात आलेले आहे.‌ त्यामुळे आज मोठ्या लसीकरण केंद्राच्या बाहेरची गर्दी संपलेली पण छोट्या लसीकरण केंद्रांवर मात्र याच्या विरुद्ध चित्र बघायला मिळालं.

मुंबईच्या विलेपार्ले परिसरातील शिरोडकर प्रसुतीगृह येथे सुरू असलेल्या लसीकरण केंद्रावर आज लस आहे पण लसीकरण मोहीम नाही असे काहीचे चित्र दिसून आले. कारण लसीकरण करण्यासाठी लागणारे नागरिक या केंद्रावर होते आणि त्यांना देण्यासाठी गरजेची असलेली लस सुद्धा केंद्रावर उपलब्ध होती पण नागरिकांनी नोदंणी केलेली नव्हती. याचा परिणाम असा झाला की नोंदणी केलेले तीन नागरिक बराच वेळ केंद्रावर होते, परंतु त्यांना लसीकरण करता आलं नाही कारण लसीची एक कूपी तोडली तर त्यामध्ये दहा जणांचे लसीकरण करावे लागते.‌ ते झाले नाही तर थोड्यावेळात उर्वरित डोस वाया जातात. त्यामुळे तीन नागरिकांसाठी कूपी तोडली जाऊ शकत नाही अशी माहिती स्थानिक महापालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.‌

हे वाचा-सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा! शिवसेनेचे मंत्री विकास कामांच्या उद्घाटनात व्यस्त

आपल्याकडे लसीचे 50 डोस उपलब्ध आहेत परंतू नोंदणी केलेले किमान 10 नागरिक जोपर्यंत येत नाही तोपर्यंत लसीकरण सुरू करता येणार नाही अशी माहितीही त्यांनी दिली. दुसरीकडे भाजपचे स्थानिक नगरसेवक अभिजीत सामंत यांनी काढण्यात आलेल्या परिपत्रक यावर नाराजी व्यक्त करत त्यात बदल करण्याची मागणी केलेली आहे. कारण या केंद्रावर त्यांनी काल नियोजनबद्ध पद्धतीने 70 वयोवृद्ध नागरिकांचे ज्यांचे वय 80 च्या वरचे आहेत त्यांचे लसीकरण करून घेतले असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आज सत्तरीच्या वरच्या नागरिकांना लसीकरणासाठी बोलावण्यात आले होते परंतु वॉकिन पद्धत रद्द केल्यामुळे त्या नागरिकांना माघारी जावे लागले.

हे वाचा-कोरोनाकाळात दुहेरी संकट! BMC डॉक्टरांचा संपाचा इशारा, पगारवाढीचा प्रश्न ऐरणीवर

इतकेच नाही तर अनेक नागरिकांना नोंदणी करताना अडचणी येत आहेत. त्यातच सहा आठवडे कालावधी संपला आणि लसीकरणाचा दुसरा डोस झाले नाही. तर घेतलेला पहिला डोसही वाया जाईल अशी भीती वाटती त्यामुळे लसीकरणाच्या एकूण राष्ट्रीय कार्यक्रम आलाच या निर्णयामुळे खीळ बसू शकते असं मत त्यांनी व्यक्त केला आहे ‌

Published by: Janhavi Bhatkar
First published: May 7, 2021, 12:40 PM IST

ताज्या बातम्या