मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबईत शाळा सुरू करण्याबाबतची योजना हळूवार, पालिकेनं आखला नवा प्लान

मुंबईत शाळा सुरू करण्याबाबतची योजना हळूवार, पालिकेनं आखला नवा प्लान

मुंबईत शाळा सुरु होण्यापूर्वी पालिका सज्ज झाली आहे. मात्र पालिका शाळा सुरु करण्याबाबत वेगळी योजना आखत असल्याचंही समजतंय.

मुंबईत शाळा सुरु होण्यापूर्वी पालिका सज्ज झाली आहे. मात्र पालिका शाळा सुरु करण्याबाबत वेगळी योजना आखत असल्याचंही समजतंय.

मुंबईत शाळा सुरु होण्यापूर्वी पालिका सज्ज झाली आहे. मात्र पालिका शाळा सुरु करण्याबाबत वेगळी योजना आखत असल्याचंही समजतंय.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 27 नोव्हेंबर: दोन दिवसांपूर्वी राज्यभरात प्राथमिक शाळा सुरु (primary school opening date in maharashtra) करण्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. राज्यात येत्या 1 डिसेंबरपासून प्राथमिक शाळा (primary school reopening in maharashtra) सुरु करण्याच्या प्रस्तावाला कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली. त्यानंतर मुंबईत शाळा सुरु होण्यापूर्वी पालिका सज्ज झाली आहे. मात्र पालिकेनं सुरुवातीला प्राथमिक शाळा सुरु करण्याआधी माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी ऑफलाइन वर्ग सुरु करण्याची योजना आखत आहेत.

राज्यात येत्या 1 डिसेंबरपासून प्राथमिक शाळा (primary school reopening in maharashtra) सुरु करण्याच्या प्रस्तावाला कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता आठवी ते बारावीबरोबरच प्राथमिक शाळा म्हणजेच पहिली ते सातवीच्या शाळाही सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र मुंबई पालिका प्राथमिक आणि माध्यमिक वर्ग पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेणार आहे.

हेही वाचा-  नोकरी मिळवण्यासाठी तरुणाने असं काही केलं, की तीन तासांमध्ये आल्या अनेक ऑफर्स

 शाळा 5 ते 7 वी आणि इयत्ता 8 ते 10 या वर्गांना सामावून घेण्याच्या तयारीत आहेत. बहुतेक शाळा प्रत्येकी तीन ते चार तासांच्या दोन तुकड्यांमध्ये कार्यरत असतील. त्यामुळे मुंबई पालिका सुरुवातीला पाचवी ते सातवी पर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा विचार करत आहे. त्यानंतर पहिली ते चौथी असे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेणार असल्याचं समोर येतंय.

शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना सर्व वर्ग पुन्हा सुरू करण्यासाठी शाळांना त्यांची योजना सादर करण्यास सांगितले आहे. शाळांना 5 वी ते 7 वीचे वर्ग सुरु करायचे आहेत. त्यानंतर काही आठवड्यांत प्राथमिक शाळा सुरु करायच्या आहेत.

शाळा सुरू करण्यासाठी पालिका सज्ज

मुंबईत शाळा सुरु होण्यापूर्वी येत्या दोन दिवसांत 1,159 शाळांच्या सुमारे 500 इमारतींमध्ये सॅनिटायझर फवारणी आणि शाळा स्वच्छता करण्यात येणारेत. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी होणार असल्याने विद्यार्थ्यांना मास्क घालणे बंधनकारक असेल. हात धुण्यासाठी साबणाची व्यवस्था असेल. तसेच गेटवर स्क्रिनिंगची व्यवस्थाही केली जाणार आहे.

हेही वाचा- Corona च्या नव्या स्ट्रेनला WHO नं दिलं नाव, म्हणाले...

शाळेत सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात येणार आहे. कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचं पालन केलं जाणार असल्याची माहिती पालिका शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिली.

काय होता टास्क फोर्सचा सल्ला

प्राथमिक शाळा, दिव्यांग शाळा आणि बोर्डिंग शाळा सुरू करता येतील असं टास्क फोर्सने राज्य सरकारला सल्ला दिला होता. पीडियाट्रिक टास्क फोर्स ने सुचवल्या काही उपाय योजना सुचवल्या होत्या. बोर्डिंग स्कुल म्हणजेच निवासी शाळा मध्ये येताना मात्र आरटीपीसीआर चाचणी रिपोर्ट बंधनकारक करावा असा सल्ला देण्यात आला होता.

काय म्हणाल्या शालेय शिक्षण मंत्री

"ग्रामीण भागात पाचवी ते बारावीच्या शाळा सुरु आहेत त्यामुळे आता ग्रामीण भागात पहिली ते चौथी शाळा सुरु होणार आहेत. तर शहरी भागात सध्या आठवी ते बारावीच्या शाळा सुरु आहेत म्हणूनच आता शहरी भागात पहिली ते सातवीच्या शाळा सुरु होणार आहेत. आम्ही विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि आरोग्यमय वातावरण देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. शाळांनीहे विद्यार्थ्यांची संपूर्ण काळजी घ्यावी." असं शालेय शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड यांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: BMC