मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

नोकरी मिळवण्यासाठी तरुणाने असं काही केलं, की तीन तासांमध्ये आल्या अनेक ऑफर्स

नोकरी मिळवण्यासाठी तरुणाने असं काही केलं, की तीन तासांमध्ये आल्या अनेक ऑफर्स

हैदर मलिक (Haider Malik) असं या 24 वर्षीय तरुणाचं नाव असून, तो मूळचा पाकिस्तानचा आहे.

हैदर मलिक (Haider Malik) असं या 24 वर्षीय तरुणाचं नाव असून, तो मूळचा पाकिस्तानचा आहे.

हैदर मलिक (Haider Malik) असं या 24 वर्षीय तरुणाचं नाव असून, तो मूळचा पाकिस्तानचा आहे.

लंडन, 26 नोव्हेंबर: कोरोनाच्या (Covid Pandemic) तडाख्यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थावर अभूतपूर्व नकारात्मक (Economy post covid)  परिणाम झाला आहे. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून, व्यवसायांचं खूप नुकसान झालं आहे. अनेकांना नोकरी शोधण्यात अडचणी येत आहेत. यातच ब्रिटनमधल्या (Britain) लंडन शहरात वास्तव्याला असलेल्या एका पाकिस्तानी (Pakistan) तरुणाने शक्कल लढवली आणि नोकरी मिळवण्यासाठी अनोखा मार्ग शोधला. अनेक ठिकाणी मुलाखती देऊनही नोकरी मिळत नसल्याने त्याने चक्क रेल्वे स्थानकावरच आपल्या बायोडेटाचा पॉप-अप स्टँड लावला. या अनोख्या पद्धतीमुळे तो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, याचा त्याला फायदा झाला आहे. काही तासांमध्येच त्याला नोकरीच्या अनेक ऑफर्स आल्या आहेत.

'द मिरर'च्या रिपोर्टनुसार, हैदर मलिक (Haider Malik) असं या 24 वर्षीय तरुणाचं नाव असून, तो मूळचा पाकिस्तानचा आहे. हैदरने मिडलसेक्स युनिव्हर्सिटीमधून बँकिंग आणि फायनान्समध्ये फर्स्ट क्लास मिळवला; मात्र तरीही त्याला नोकरी मिळत नव्हती. अनेकदा मुलाखत देऊनही त्याला निराशाच हाती लागत होती; मात्र त्याने हार मानली नाही. नोकरी मिळवण्यासाठी त्याने लंडन रेल्वे स्थानकावर पॉप-अप स्टँडद्वारे जाहिरात केली. त्याने एका साइन बोर्डवर आपल्या रेझ्युमेमधला तपशील लिहला. तसंच LinkedIn आणि CV चा QR कोडदेखील शेअर केला.

International Mens Day : 'कडक' भारतीय पुरुषांची जागा महिलांनी कशी घेतली?

हैदर सध्या कॅबचालक (Cab Driver) म्हणून काम करत आहे. ही कल्पना कशी सुचली असं विचारल्यावर त्याने सांगितलं, की 'माझ्या वडिलांनी मला असं करण्यास सांगितलं. सुरुवातीला मी थोडा घाबरलो. कारण, मी रिकाम्या हाती उभा होतो. माझ्या बँगेत रेझ्युमेची एक कॉपी होती. मी ती बाहेर काढली आणि तेथून जाणाऱ्या लोकांना हसत गुड मॉर्निंग म्हणून शुभेच्छा देऊ लागलो. या वेळी काही लोकांनी मला आपलं कार्ड दिले. कोणी तरी माझा फोटो काढून सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट केला.'

अमेरिकी बापलेकाचे बादशहाच्या गाण्यावर ठुमके, VIDEO पाहून चाहते म्हणाले ONCE MORE

सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यानंतर हैदरला अनेक ठिकाणाहून नोकरीसाठी कॉल आले आहेत. हैदराला एका विभाग संचालकाकडून मेसेज आला होता. त्यांनी त्याला सकाळी 10:30 वाजता मुलाखतीसाठी बोलावलं. मुलाखत कुठे होईल, याचा पत्ताही दिला होता. तो तिथे पोहोचला आणि मुलाखत दिली. मुलाखतीच्या दुसऱ्या राउंडनंतर तिथे नोकरी लागल्याचं हैदरने सांगितलं. नवी नोकरी मिळाल्यानंतर हैदरने आनंद व्यक्त केला. हैदर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्था मंदावली असल्याने बेरोजगारीचं संकट आलं आहे. अनेकांच्या नोकऱ्या-धंदे ठप्प झालेत. प्रत्येक जण आपल्यापरीने या संकटाचा सामना करत आहे. त्यातच हैदरचा समावेश आहे.

First published:

Tags: Job, London, Viral photo