जिनेव्हा, 27 नोव्हेंबर: कोरोना व्हायरस (Corona Virus) पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहे. कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटनं सर्वांचीच चिंता वाढवली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं (World Health Organization, WHO) शुक्रवारी घातक कोरोना व्हायरसच्या B.1.1529 या नवीन स्ट्रेनला 'व्हेरिएंट ऑफ कंसर्न' (Variant of concern) म्हणून संबोधलं आणि त्याला ओमिक्रोन (Omicron) असे नाव दिलं. या श्रेणीतील व्हायरस अत्यंत संसर्गजन्य मानले जातात.
डेल्टा व्हेरिएंट देखील त्याच श्रेणीत ठेवण्यात आला होता. हा व्हेरिएंट आढळण्यापूर्वीच युरोपातल्या अनेक देशांमध्ये आणि ब्रिटन, जर्मनी आणि रशियासह इतर प्रदेशांमध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढत होती. रशियामध्ये या महामारीमुळे रेकॉर्ड ब्रेक लोकांचा मृत्यू झाला होता. आता हा नवा व्हेरिएंट समोर आल्यानंतर जगात घबराट पसरली आहे.
24 नोव्हेंबरला WHO ला पोहोचला रिपोर्ट
दक्षिण आफ्रिकेत 24 नोव्हेंबर 2021 रोजी WHO कडून B.1.1.529 व्हेरिएंटमधील संसर्गाची पहिली घटना नोंदवली गेली. दरम्यान 9 नोव्हेंबर 2021 रोजी टेस्टसाठी आलेल्या सॅपलमध्ये या व्हेरिएंटचा संसर्ग आढळून आला.
WHOचे महासंचालक टेड्रोस अधनम घेब्रेसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केलं की, नवीन कोविड-19 व्हेरिएंट ओमिक्रोनमध्ये मोठ्या प्रमाणात उत्परिवर्तन आहेत, त्यापैकी काही चिंताजनक आहेत. त्यामुळे आपल्याला लसीबाबत जागरुक असायला हवे.
हेही वाचा- दक्षिण आफ्रिकेत COVID-19 चा आढळला नवा व्हेरिएंट, भारत सरकारनं जारी केले निर्देश
व्हेरिएंट ऑफ कंसर्नचा अर्थ
देशांनी जीनोम अनुक्रम शेअर केले पाहिजेत
केसेस WHO ला कळवाव्या लागतील
परिणाम समजून घेण्यासाठी तपास करावा लागेल जेणेकरून त्याचे धोके आणि सार्वजनिक आरोग्य लक्षात घेऊन योग्य व्यवस्था करता येईल.
हेही वाचा- Corona: डेल्टा व्हेरिएंटपेक्षा जास्त धोकादायक आहे हा नवा कोरोना स्ट्रेन; भारतात आहेत का रुग्ण?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india, Coronavirus