मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 वर्ल्ड कपसाठी बायो प्रोटोकॉल जारी, वाचा खेळाडू संक्रमित झाला तर काय होणार?

T20 वर्ल्ड कपसाठी बायो प्रोटोकॉल जारी, वाचा खेळाडू संक्रमित झाला तर काय होणार?

टी20 वर्ल्ड कप स्पर्धेला (ICC T20 World Cup 2021) 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेला कोरोनाचा कोणताही फटका बसू नये म्हणून आयसीसीनं (ICC) खबरदारी घेतली आहे.

टी20 वर्ल्ड कप स्पर्धेला (ICC T20 World Cup 2021) 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेला कोरोनाचा कोणताही फटका बसू नये म्हणून आयसीसीनं (ICC) खबरदारी घेतली आहे.

टी20 वर्ल्ड कप स्पर्धेला (ICC T20 World Cup 2021) 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेला कोरोनाचा कोणताही फटका बसू नये म्हणून आयसीसीनं (ICC) खबरदारी घेतली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 8 ऑक्टोबर : टी20 वर्ल्ड कप स्पर्धेला (ICC T20 World Cup 2021) 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार भारतामध्ये होणार होती. पण, कोरोना व्हायरसच्या कारणामुळे यूएई आणि ओमान या दोन देशांमध्ये होणार आहे. या स्पर्धेला कोरोनाचा कोणताही फटका बसू नये म्हणून आयसीसीनं (ICC) खबरदारी घेतली आहे. टी20 वर्ल्ड कपच्या काळात कडक बायो-बबल (T20 World Cup Bio-Bubble Protocol) जारी करण्यात येणार आहे. या स्पर्धेचा प्रोटोकॉल तयार करण्यासाठी यूरो 2020, टोकयो ऑलिम्पिक (Tokyo Olympics 2020) स्पर्धेची जैव सुरक्षा तयार करणाऱ्यांची मदत घेण्यात आली आहे.

आयसीसीचे बायो-सेफ्टी हेड एलेक्श मार्शल यांनी यावेळी सांगितले की, 'या स्पर्धेच्या काळात कोणतीही कमतरता राहू नये म्हणून आम्ही विशेष खबरदारी घेतली आहे. त्यासाठी टोकयो ऑलिम्पिक, युरो कप, फॉर्म्युला वन या स्पर्धेची जैव सुरक्षा करणाऱ्या तज्ज्ञांची मदत घेण्यात आली आहे. आयपीएल स्पर्धेचा सेकंड हाफ (IPL 2021 Second Half) इथं होत आहे. अनेक सीरिज देखील झाल्या आहेत. त्या अनुभवाचाही आम्हाला उपयोग होत आहे.'

कसा होणार बायो-बबलमध्ये प्रवेश?

टी20 वर्ल्ड कपमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व टीमला 6 दिवस आयसोलेशनमध्ये राहणे बंधनकारक आहे. या कालावधीमध्ये खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या 3 कोरोना टेस्ट घेण्यात येतील. स्पर्धा सुरू झाल्यावर कुणालाही कोरोनाची लागण होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे.

BCCI नं मदत थांबवली तर पाकिस्तान क्रिकेटचं दिवाळं वाजेल! PCB अध्यक्षांची कबुली

खेळाडू संक्रमित झाला तर...

आयसीसीच्या नियमावलीनुसार बायो-बबलमधील कोणत्याही खेळाडूला कोरोनाची लागण झाली तर त्याच्यात लक्षणं आढळली नाहीत तरीही 10 दिवस त्याला आयसोलेशनमध्ये राहावं लागेल. आयसीसीसीनं कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींसाठीही नियमावली तयार केली आहे.

कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यानं मास्क घातला नसेल आणि त्याचे परिक्षण/लक्षणं आढळल्यानंतर किमान 15 मिनिटं ते कमाल 48 तासपूर्वी संक्रमित व्यक्तीच्या 2 मीटर पेक्षा कमी अंतरावर असेल तरच त्याला 'क्लोज कॉन्टॅक्ट' समजले जाईल. अशा व्यक्तींना 6 दिवस आयसोलेशनमध्ये राहावं लागेल. त्याचबरोबर जो व्यक्ती कोरोना संक्रमित व्यक्तीच्या चुकून संपर्कात आला असेल आणि त्यानं संपर्काच्या काळात मास्क घातला असेल त्याला 24 तास वेगळं राहवं लागेल. त्याची टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्याला सोडण्यात येईल.

टी20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियासाठी Good News, विराटचा 'हा' सहकारी जबरदस्त फॉर्मात

प्रेक्षकांसाठी काय नियम?

ओमान आणि अबू धाबीमध्ये स्टेडियममध्ये मॅच पाहण्यासाठी उपस्थित राहणाऱ्या प्रेक्षकांनी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. पण दुबई आणि शारजाहमध्ये हा नियम लागू नाही. तिथं स्टेडियमध्ये उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांना कायम मास्क घालावा लागेल.

First published:

Tags: Icc, T20 world cup