वडाळ्यात इमारतीच्या पार्किंगची भिंत कोसळल्यामुळे दोस्ती बिल्डर्सच्या विरोधात गुन्हा दाखल

वडाळ्यात इमारतीच्या पार्किंगची भिंत कोसळल्यामुळे दोस्ती बिल्डर्सच्या विरोधात गुन्हा दाखल

दोस्ती ग्रुपचे दीपक गोराडिया, किशन गोराडिया आणि राजेश शहा यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालाय. पण इमारतीतले रहिवासी यावर समाधानी नाहीयेत.

  • Share this:

मुंबई, 26 जून : मुंबईच्या वडाळा भागात काल शेकडो नागरिकांचा जीव धोक्यात आला होता. तोही बिल्डरच्या हलगर्जीपणामुळे आणि पैशांच्या हव्यासामुळे.

हेही वाचा

आणीबाणीवरून राजकारण तापलं ! देशात ४ वर्षांपासून अघोषित आणीबाणी, मनसेची टीका

प्लास्टिक बंदीमुळे गिरीश महाजनांनी कागदावरच खाल्ली झुणका-भाकर !

मफतलाल समूहाच्या विशाद मफतलाल यांनी मुंबईत घेतलं 89 कोटींचं घर !

ही दृश्यं कोणत्या खाणीची नाही तर मुंबईतल्या एका रहिवाशी भागातली आहेत. सोमवारी पहाटे लॉईड्स इस्टेट या इमारतीची भिंत कोसळली आणि एक छोटा रस्ता खचला. कशामुळे ? तक शेजारी सुरू असलेल्या बांधकामामुळे. यामध्ये 11 गाड्यांचं नुकसान झालं, तर इमारतीतल्या 200 जणांना बाहेर काढावं लागलं. दोस्ती ग्रुपचे दीपक गोराडिया, किशन गोराडिया आणि राजेश शहा यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालाय. पण इमारतीतले रहिवासी यावर समाधानी नाहीयेत.

इतक्या लोकांचा जीव धोक्यात येत असेल तर अशा प्रकल्पांना मंजुरी मिळतेच कशी हा प्रश्न आहे. यावरच आम्ही काही सवाल उपस्थित केलेत.

पालिकेच्या बांधकाम प्रस्ताव विभागानं वादग्रस्त बांधकामाला परवानगी दिलीच कशी?

बड्या बिल्डरांसमोर पालिका अधिकारी पायघड्या घालतात का ?

बिल्डरांना राजकीय आश्रय नेमका कुणाचा ?

स्थानिकांच्या विरोधाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आलं का ?

लॉईड इमारतीतीत उच्चभ्रू लोकांच्या स्थलांतराचा खर्च महापालिकेला पेलवणार का?

बिल्डर आणि काही अधिकाऱ्यांच्या हव्यासापोटी आणखी किती नागरिकांचे जीव धोक्यात घातले जाणार आहेत, असा संतप्त सवाल मुंबईकर विचारतायेत. तेही आज नाही, अनेक वर्षांपासून. पण बीएमसीनं बोध घ्यायचाच नाही, असंच बहुधा ठरवलेलं दिसतंय.

First published: June 26, 2018, 10:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading