• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • फेसबुकचा Jio सोबत मोठा करार, 43 हजार 574 कोटींची गुंतवणूक

फेसबुकचा Jio सोबत मोठा करार, 43 हजार 574 कोटींची गुंतवणूक

फेसबुकने 43,574 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. फेसबुकने यासंदर्भात बुधवारी मोठी घोषणा केली.

 • Share this:
  मुंबई, 22 एप्रिल : अमेरिकेतील सोशल मीडिया कंपनी फेसबुक (Facebook) ने भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या jio सोबत मोठा करार केला आहे. फेसबुकचा आणखीन विस्तार करण्यासाठी भारतातील सर्वात मोठी डिजिटल कंपनी रिलायन्स जिओ सोबत एक करार केला आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या डिजिटल ऑपरेशनने रिलायन्स जिओमध्ये फेसबुकने 43 हजार 574 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. फेसबुकने यासंदर्भात बुधवारी मोठी घोषणा केली. फेसबुक (Facebook ) कंपनीची Jio मध्ये 9.99 टक्के भागीदारी (Stake)- कंपनीने दिलेल्या माहितीनुसार सोशल मीडियामधील लोकप्रिय प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुकने भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या रिलायन्स जिओमध्ये 9.99 टक्के भागीदारी घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर जिओसोबत एक करार केला असून फेसबुकने त्यामध्ये तब्बल 43 हजार 574 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या करारामुळे फेसबुक रिलायन्स जिओमध्ये भागदारक असलेली सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. 2016मध्ये  रिलायन्स कंपनीने टेलिकॉम क्षेत्रात जिओ आणलं. जिओनं 4 वर्षांमध्ये प्रतिस्पर्धांना टक्कर देत टेलिकॉम क्षेत्रात आपलं वचर्स्व निर्माण केलं आहे. रिलान्सने टेलिकॉम ते होम ब्रॉडबॅण्डपर्यंत आपल्या सेवा विस्तारीत केल्या आहेत. भारतात फेसबुक आणि मेसेस अॅप आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी वापरलं जाणारं अॅप म्हणजे व्हॉटसअॅपचं मोठं मार्केट आहे. फेसबुकचे 400 मिलियन यूझर्स आहेत. 2020 मध्ये इंटरनेट यूझर्सची संख्या दुप्पट होण्याची अशा आहे. संपादन- क्रांती कानेटकर
  Published by:Kranti Kanetkar
  First published: