रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना देणार जादा वेतन

रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना देणार जादा वेतन

कोरोनाशी लढण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 एप्रिल : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या कोरोनाशी लढण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना जादा वेतनासह इतर फायदे दिले जाणार असल्याची माहिती रिलायन्सकडून देण्यात आली.  मुंबईतील सर एचनएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलचे कर्मचारी कोरोनाच्या ट्रीटमेंटसाठी अहोरात्र काम करत आहेत. त्यांनी एक महिन्याचा सीटीसी जादा दिला जाणार असून सेवन हिल्स हॉस्पिटल, इमर्जन्सी रूम आणि दोन आयसोलेशन रुममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही अतिरिक्त वेतनाशिवाय जास्तीचे पैसे दिले जाणार आहेत.

याबाबत सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकाऱी ज्ञानचंदानी यांनी एक पत्र लिहिलं आहे. त्यात म्हटलं की, आम्ही आरएफएच मधील सर्व टीमचे आभार मानतो. कोरोनाविरुद्धच्या या लढ्यात तुम्ही एकत्र होऊन काम करत आहात. आपण सर्वजण खरे योद्धे आणि रिअल हिरो आहात. तुमच्या या कर्तव्यनिष्ठेचा आणि संकटकाळात दिलेल्या या आधाराचा आम्हाला अभिमान आहे. याकाळात तुम्ही खासकरून सेव्हन हिल्स आणि इआर आयसोलेशन युनिटमधील टीमनं निष्ठेनं काम केलं.

रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचे प्रयत्न आणि त्यांच्या या कामाचं कौतुक म्हणून हे एक गिफ्ट दिलं जात असल्याचं ज्ञानचंदानी म्हणाले. सध्याच्या या कठीण काळात सर्वजण अविरत काम करत आहेत. याचं कौतुक आणि कृतज्ञता म्हणूनच एक महिन्याचं जादा वेतन दिलं जाणार आहे. सेव्हन हिल्स, ईआर आणि दोन आयसोलेशन रुममध्ये जोखमीचं काम असलेल्या ठिकाणी लढणाऱ्या कर्मचाऱ्यांना जादाच्या वेतनाशिवाय अधिक रक्कम देण्याचा निर्णय़ घेतला असल्याचंही त्यांनी सांगितलं.

सध्या घरगुती किराणा मालाच्या वाटपामध्ये थोड्या अडचणी आहेत. साहित्याच्या पिशव्या देण्यात येतील. जर हॉस्टेलवर कर्मचारी नसतील तर रुग्णालयात येऊन कर्मचाऱ्यांना दिल्या जातील. ईआरमध्ये काम करत असलेल्यांसाठी आवश्यक तेवढं आणि सर्वोत्कृष्ट अशी सुरक्षेची उपकरणं पुरवली जात आहेत. सेव्हन हिल्स आणि आरएफएच इथं कोरोनाचे रुग्ण असून इथं कर्मचाऱ्यांना उच्च दर्जाचं साहित्य देण्यात आलं आहे.

हे वाचा : लॉकडाऊनदरम्यान 1600 किमी अंतर चालत पोहोचला घरी, आई-भावाने दारंच उघडलं नाही

सर्व कर्मचाऱ्यांना आरएफएसमध्ये प्रवास करत असताना पाणी, बिस्किट आणि मास्क दिले जातील. तसंच त्यांच्यासाठी मोफत बससेवासुद्धा उपलब्ध आहे. याशिवाय भेट देणाऱ्या सर्व सल्लागारांची 15 मार्चपासूनची फी माफ असेल. त्यावर कर्मचाऱ्यांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणाऱ नाही. या काळात आरएफएचमधील कर्मचाऱ्यांना जेवणही मोफत दिलं जाईल. कर्मचाऱ्यांपैकी कुणाला किंवा त्यांच्या कुटुंबियातील कोणास कोरोनाची लागण झाली असेल किंवा वैद्यकीय मदत हवी असेल तर रिलायन्स फाउफंडेशन त्यांची सर्व काळजी घेईल असंही सांगण्यात आलं आहे.

हे वाचा : सावध राहा! सरकार म्हणतं, कोरोनाच्या उद्रेकाची सर्वोच्च स्थिती आलेली नाही

First published: April 13, 2020, 10:46 PM IST

ताज्या बातम्या