• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • ALERT! या बँकेत खातं असेल तर आजच जवळच्या शाखेत करा संपर्क, अन्यथा खोळंबतील आर्थिक कामं

ALERT! या बँकेत खातं असेल तर आजच जवळच्या शाखेत करा संपर्क, अन्यथा खोळंबतील आर्थिक कामं

सिंडिकेट बँकेचे एक एप्रिल 2020 पासून कॅनरा बँकेत विलिनीकरण झाले आहे त्यामुळे या बँकेचे IFSC कोड 1 जुलैपासून बदलणार आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 08 जून: सिंडिकेट बँकेच्या (Syndicate Bank) ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे.  सिंडिकेट बँकेचे एक एप्रिल 2020 पासून कॅनरा बँकेत (Canara Bank) विलिनीकरण झाले आहे त्यामुळे या बँकेचे IFSC कोड 1 जुलैपासून बदलणार आहेत. अशावेळी सिंडिकेट बँकेचे सध्याचे आयएफएससी कोड 30 जून 2021 पर्यंत वैध असणार आहेत. 1 जुलैपासून बँकेचे नवीन IFSC कोड लागू होणार आहेत. सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांना आता जवळच्या बँक शाखेमध्ये जाऊन नवीन IFSC कोड मिळवावा लागेल. बँकेने ग्राहकांना केलं अलर्ट कॅनरा बँक सतत त्यांच्या ग्राहकांना याबाबत अलर्ट पाठवत आहे. कॅनरा बँकेने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर म्हटले आहे की प्रिय ग्राहक, कॅनरा बँकेत सिंडिकेट बँकेच्या विलीनीकरणानंतर, सर्व सिंडिकेट आयएफएससी कोड (भारतीय वित्तीय प्रणाली कोड) SYNB पासून सुरू होणारे 11 अंकी अल्फान्यूमेरिक कोड बदलणार आहेत. हे वाचा-6 कोटी PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! हे काम पूर्ण न केल्यास मिळणार नाहीत पैसे आता हे असणार कोड बँकेच्या मते, SYNB ने सुरू होणारे सर्व IFSC कोड 1 जुलैपासून निष्क्रिय होतील. बँकेने पुढे असं म्हटलं आहे की, 'आम्ही तुम्हाला विनंती करतो की NEFT/RTGS/IMPS करताना ग्राहकांनी केवळ CNRB ने सुरू होणाऱ्या IFSC चा वापर करावा.' हे वाचा-Gold Price Today: खूशखबर! रेकॉर्ड स्तरावरुन 7000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं बँकेशी करा संपर्क नवीन कोड माहित करुन घेण्यासाठी सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांना कॅनरा बँकेच्या वेबसाइटवर http://www.canarabank.com/ जावे लागेल. याठिकाणी 'What's New' वर क्लिक करा. त्यानंतर 'KIND ATTN eSYNDIATE CUSTOMERS: KNOW YOUR NEW IFSC' यावर क्लिक करा. याठिकाणी तुम्हाला नवीन IFSC आणि MICR कोडबाबत माहिती मिळेल. याशिवाय तुम्ही कॅनरा बँकेच्या ग्राहक सेवा क्रमांक 18004250018 यावरही संपर्क करून माहिती मिळवू शकता. 
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: