डोंगरी दुर्घटना : तिने मुलांना कुशीत घेतल्याने मुलं बचावली पण तिचा मात्र जीव गेला

डोंगरी दुर्घटना : तिने मुलांना कुशीत घेतल्याने मुलं बचावली पण तिचा मात्र जीव गेला

मुंबईत डोंगरी परिसरात केसरबाई इमारत कोसळली तेव्हा दोन मुलं मात्र त्यांच्या आईच्या प्रसंगावधानामुळे आश्चर्यकारकरित्या बचावली. ही इमारत कोसळत होती तेव्हा तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या सादिया सुमरा या त्यांच्या आईने त्यांना कुशीत ओढून घेतलं.

  • Share this:

स्वाती लोखंडे

मुंबई, 16 जुलै : मुंबईत डोंगरी परिसरात केसरबाई इमारत कोसळली तेव्हा दोन मुलं मात्र त्यांच्या आईच्या प्रसंगावधानामुळे आश्चर्यकारकरित्या बचावली. ही इमारत कोसळत होती तेव्हा तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या सादिया सुमरा या महिलेने प्रसंगावधान दाखवलं.

सादिया तिच्या मुलांसाठी नाश्ता आणायला स्वयंपाकघरात जात होती. त्याच वेळी तिला काहीतरी हलल्याचं लक्षात आलं. तिने पटकन आपल्या दोन्ही मुलांना जोरात मांडीवर ओढून घेतलं. त्यानंतर काहीच वेळाने हा भाग कोसळला.तेव्हा ही मुलं तिच्या कुशीत होती. पण हे संकट एवढ्यावरच थांबलं नाही.

डोंगरीत 4 मजली इमारत कोसळली; ग्राऊंड झिरोवरून पहिला VIDEO

इमारतीचा लोखंडी खांब सादियाच्या अंगावर पडला. त्याहीवेळेस तिने तो वार झेलला आणि मुलांना अलगद कुशीत सांभाळलं. हा खांब अंगावर पडून सादिया तिथेच मरण पावली. त्यावेळी तिची मुलं मात्र बचावली.

सादियाचा नवरा निसार हाही इमारतीचा जो भाग पडला नाही त्या भागात होता. त्यामुळे तोही बचावला.

इमारतीत 15 कुटुंबं

डोंगरी परिसरातली ही केसरबाई इमारत 100 वर्षं जुनी होती. या इमारतीत 15 कुटुंब राहत होती. त्यामुळे इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सुमारे 50 जण अडकल्याची भीती होती. या सगळ्यांना बाहेर काढण्यासाठी यंत्रांचा वापर न करता ढिगारा हातानेच बाजूला करण्याचं काम सुरू होतं.

अब्दुल हमीद दर्ग्याच्या शेजारी असलेली केसरबाई इमारत सकाळी साडेअकराच्या सुमारास कोसळली. या घटनेची माहिती स्थानिकांनी आपत्कालीन विभागाला दिली. इमारत कोसळल्यानंतर अग्निशामक दल आणि बचाव पथकं तातडीने रवाना झाली. याठिकाणी अजूनही बचावकार्य सुरू आहे.​

====================================================================================================

VIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेंकदात इमारत कोसळली'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 16, 2019 04:53 PM IST

ताज्या बातम्या