जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / मुंबई: खाल्लं-प्यायलं आणि उलटले; राजकीय नेत्यांनी पैसे बुडवल्याने कॅटरिंग व्यावसायिकाची आत्महत्या

मुंबई: खाल्लं-प्यायलं आणि उलटले; राजकीय नेत्यांनी पैसे बुडवल्याने कॅटरिंग व्यावसायिकाची आत्महत्या

यातील मृत महिला हरविल्याची फिर्याद तिच्या पतीने 1 मे रोजी कळंबोली पोलीस ठाण्यात नोंदविली होती अशी माहिती समोर आली आहे.

यातील मृत महिला हरविल्याची फिर्याद तिच्या पतीने 1 मे रोजी कळंबोली पोलीस ठाण्यात नोंदविली होती अशी माहिती समोर आली आहे.

Suicide in Mumnbai: मुंबईत एका कॅटरिंग व्यावसायिकानं गळफास घेत आत्महत्या (Catering businessman commits suicide) केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित व्यावसायिकानं आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत खळबळजनक खुलासा केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 19 नोव्हेंबर: मुंबईनजीक असणाऱ्या चेंबूर याठिकाणी एका कॅटरिंग व्यावसायिकानं गळफास घेऊन आत्महत्या (Catering businessman commits suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित व्यावसायिकानं आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत (Suicide note) खळबळजनक खुलासा केला असून आत्महत्येसाठी कारणीभूत असलेल्या लोकांची नावं चिठ्ठीत लिहिली आहे. या प्रकरणी गोवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. प्रकाश राठोड असं आत्महत्या करणाऱ्या कॅटरिंग व्यावसायिकाचं नाव आहे. ते चेंबर येथील पांजरापोळ परिसरातील रहिवासी आहे. मृत राठोड यांचा कॅटरिंगचा व्यवसाय असून ते देवनार, चेंबूर आणि गोवंडी परिसरात विविध कार्यक्रमासाठी जेवण पुरवण्याचं काम करत होते. संबंधित परिसरातील काही बड्या राजकीय नेत्यांनी त्यांच्याकडून अनेकदा जेवणाची ऑर्डर घेतली होती. पण जेवणाचे लाखो रुपयाचं बिल संबंधित राजकीय नेत्यांनी थकवलं (Not paid bill) होतं. हेही वाचा- Akola : वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाच्या नावाखाली शेकडो विद्यार्थ्यांची फसवणूक राजकीय नेत्यांनी लाखों रुपयांची देणं थकवल्याने मृत प्रकाश राठोड कर्जबाजारी झाले होते. अनेकदा विनवणी करूनही राजकीय नेते पैसे देण्यास टाळाटाळ करत होते. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या मुजोरीला कंटाळून प्रकाश राठोड यांनी देवनार येथील एका हॉलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच गोवंडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, त्यांना प्रकाश राठोड यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी मिळाली आहे. हेही वाचा- ‘आता माझ्याकडे बंदूक असती तर…’ धमकी देत NCP आमदाराच्या कानशिलात लगावल्या संबंधित चिठ्ठीत त्यांनी आत्महत्या करण्याचं कारण लिहिलं असून संबंधित देणं बुडवणाऱ्या राजकीय नेत्यांची नावं लिहिली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास गोवंडी पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात