मान्सूनचा दक्षिणेकडून पश्चिमेकडे प्रवास सुरू आहे. मान्सूनचा आतापर्यंत रत्नागिरीतील हर्णे, अहमदनगर, औरंगाबाद, गोंदिया येथेपर्यंत प्रवास झाला आहे. पुढील 24 तासांत महाराष्ट्रातील सर्व भागात मान्सून सक्रीय होणार असल्याचा अंदाज आहे. मुंबईत साधारण 9-10 जूनला मान्सून दाखल होत असतो. यंदा मात्र, मान्सूनला मुंबईत पोहोचण्यास 3-4 दिवस विलंब झाला आहे. मान्सूनची सद्यस्थिती आणि मुंबईत आगमनावर काय म्हणाल्या... शुभांगी भुत्ते (कुलाबा वेधशाळा)SW Monsoon has further advanced into some more parts of Maharashtra 13 Jun. Onset line now from 18°N AS, Harnai, Ahmednagar, Aurangabad, Gondia, Champa, Ranchi ... Conditions r favorable for covering remaining parts of Maharashtra, including Mumbai, parts of S Guj in next 24 hrs. pic.twitter.com/u8QbLboUqU
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 13, 2020
नाशिकला झोडपलं, गोदाकाठी पाणीच पाणी... दरम्यान, नाशिक शहरात शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदाकाठी पाणीच पाणी झालं आहे. अनेक वाहनं पाण्यात गेली. निसर्ग चक्रीवादळानंतर नाशिकमध्ये पाऊस झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. मुसळधार पाऊस झाल्यानंतर गोदावरी नदीला पूर येतो. मात्र, यंदा पहिल्या पावसातच गोदावरी दुथडी भरून वाहत आहेय पहिल्या पावसातच नाशिकमधील रस्त्यांवर पाणी आल्याने महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी केलेल्या कामांची पोलखोल झाल्याचं दिसून आलं आहे. त्याचप्रमाणे राज्यात विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. कोकण, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात बारामती, मराठवाड्यातील बीड, विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या भागापर्यंत मान्सून पोहोचला आहे. इतर महत्त्वाच्या बातम्या... तुम्हाला रस्त्यावर फोडून काढल्या शिवाय राहणार नाही, मनसे नेत्याचा खळ्ळ-खट्याक इशारा कोविड रूग्णालयात महिलेवर सुरू आहे उपचार, तिकडे चोरट्यांनी घरावर मारला डल्ला अरे बापरे! शेतातील धुऱ्याचा वाद पेटला, 2 सख्ख्या भावांची निर्घृण हत्यामान्सूनची सद्यस्थिती आणि मुंबईत आगमनावर काय म्हणाल्या... शुभांगी भुत्ते (कुलाबा वेधशाळा)#Monsoon2020 #MonsoonUpdate #MumbaiMonsoon pic.twitter.com/W02mMC5sCg
— News18Lokmat (@News18lokmat) June 13, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Monsoon