बुलडाणा, 12 जून: शेतातील धुऱ्याचा वाद टोकाला पोहोचून दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी दुसरे तिसरे कोणी नसून मृतांचे चुलत भाऊ आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यामधील धामणगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या शिंदखेडा गावात शुक्रवारी ही घटना घडली. या घटनेमुळे बुलडाणा जिल्ह्यात खळबळ निर्माण झाली आहे.
हेही वाचा... कोविड रूग्णालयात महिलेवर सुरू आहे उपचार, तिकडे चोरट्यांनी घरावर मारला डल्ला
सुभाष रामलाल मोरे (50) आणि त्र्यंबक रामलाल मोरे (48) अशी मृतांची नावं आहेत तर सुनील सुभाष मोरे, अनिल तुळशीराम मोरे अशी जखमींची नाव आहेत. जखमींना बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे.
गजानन मोरे (वय 45), उमेश गजानन मोरे, मंगेश गजानन मोरे अशी आरोपींची नावं आहे. तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
शेतीच्या जुन्या वादावरून शुक्रवारी भाऊबंधकीत वाद उफाळून आला. वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. यात सुभाष मोरे आणि त्र्यंबक मोरे या दोन्ही भावाचा जागेवरच मृत्यू झाला. हाणामारीत दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहे. जखमींना बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस पुढील कार्यवाही करत आहेत.
हेही वाचा....शेतकरी बापाला असा सलाम कोणीच केला नसेल, या फोटोमागच्या लेकीची कहाणी उर भरून आणेल
चुलत भावांमध्ये शेतीच्या कारणावरून अनेक दिवसांपासून वाद होते. शेतातील धुऱ्याच्या कारणावरून प्रचंड हाणामारी झाली व त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.