Home /News /maharashtra /

मेळघाटातील आदिवासींनी करून दाखलवं, 'हे' गाव 4 वर्षांपूर्वीच झालं 'आत्मनिर्भर'

मेळघाटातील आदिवासींनी करून दाखलवं, 'हे' गाव 4 वर्षांपूर्वीच झालं 'आत्मनिर्भर'

मेळघाटात नेहमी रोजगाराची समस्या राहते. मात्र, राहू गावानं तर मेळघाटातील आदिवासी व जगाला आदर्श देणारं काम केलं आहे.

अमरावती, 15 जुलै: अतिदुर्गम मेळघाटच्या 614 लोकवस्ती असलेल्या राहू गावात पेरणी पूर्ण झाली आहे. पेरणीपूर्वी गावातील महिला त्यांचं पारंपरिक नृत्य सादर करत आहेत. कदाचित भारतात कोरोनाच्या सावटाखाली आनंदी असणार राहू एकमेव गाव असेल. कारण गेल्या चार वर्षांपासून राहू गाव आत्मनिर्भर झालं आहे. मेळघाटात नेहमी रोजगाराची समस्या राहते. मात्र, राहू गावानं तर मेळघाटातील आदिवासी व जगाला आदर्श देणारं काम केलं आहे. हेही वाचा...खाण्यावरून तीन हत्ती भिडले, जबरदस्त लढाईचा पाहा दुर्मीळ VIDEO देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'आत्मनिर्भर' भारताची घोषणा करण्यापूर्वीच मेळघाटातील राहू गाव आत्मनिर्भर झालं आहे. कोरोना काळात सरकारच्या मदतीवर विसंबून न राहता आत्मनिर्भर राहू गावातील ग्रामसभेने प्रत्येक कुटुंब प्रमुख महिलेच्या खात्यात 10 हजार रूपये जमा केले. वनहक्क आणि पेसा कायद्याने हे शक्य झालं आहे. यासाठी 'खोज' या संस्थेच्या पौर्णिमा उपाध्याय यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन केलं. ग्राम सभेने राहू गावातील प्रत्येक कुटुंबाला 10 हजारांची थेट मदत केली. गावातील 200 कुटुंबांना याचा लाभ मिळाला असल्याचं ग्रामसभा सचिव धन्नू दारशिंदे यांनी सांगितलं. देशासह राज्यात कोरोनाचा सर्वाधिक फटका मजुरांना बसला आहे. रोजगारासाठी मेळघाटातील स्थलांतर मजुरांचीही संख्या मोठी असते. मात्र, लॉकडाऊनचा फटका राहू गावाला बसला नाही. गेल्या चार वर्षांपासून राहू गाव आत्मनिर्भर झालं आहे. संघटीत प्रयत्नातून गावानेच त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवला आहे. वनहक्क आणि पैसा कायद्याचा वापर करत राहू गावाने सन्मानाने अनेकांच्या उत्पन्नाचा प्रश्न सोडवला. संपूर्ण गाव जवळपास 4500 हेक्टरच्या जंगलाचं व्यवस्थापन करतात. राहू गावातील स्त्री-पुरुष बांबू कापायला जातात. 1 बांबू कापण्याचे दहा रुपये मिळतात. एका दिवसांत एक दाम्पत्य 100 बांबू कापते. त्यातून एका दिवसात दाम्पत्य एक हजार रुपये कमावते. जंगलातील बांबू विक्री ग्रामसभेच्या माध्यमातून केली जात असल्याची माहिती सरपंच संजू कास्देकर यांनी दिली. बांबू तोडीमधून ग्रामसभेनं गेल्या चार वर्षात राहू गावाने चार कोटींची उलाढाल केली आहे. उत्पन्नातील काही भाग मजुरी, वाहतूक, आणि इतर कामावर खर्च केला जातो. त्यातून जवळपास 3 कोटींचा निव्वळ नफा गाव कमवत येणाऱ्या मोसमासाठी ठराविक पैशाची तरतूद करून इतर पैसा गावाच्या प्रगतीसाठी खर्च केला जातो. लॉकडाऊन सारख्या अडचणीच्या काळात वनविभागाला विश्वासात घेऊन 200 कुटुंब प्रमुख महिलेच्या खात्यात 10 हजाराची मदत ग्रामसभेनं केली. बांबू नफ्यातून गावात सार्वजनिक प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्याचा नळ,प्रत्येक महिलेला गॅस ,शाळेची दुरुस्ती, इत्यादी कामे करण्यात आली. हेही वाचा.. मृतदेहाचा फोटो काढायला गेला फोटोग्राफर, अचानक मृताच्या तोंडातून आला आवाज आणि... गेल्या अनेक वर्षांपासून मेळघाटात खोज नावाची संस्था आदिवासींच्या हक्कासाठी काम करत आहे, खोज च्या पौर्णिमा उपाध्याय यांच्या मार्गदर्शन यामुळेच राहू गावातील हे गाव आत्मनिर्भर झालं आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या