मुंबई, 20 जून : विधान परिषद निवडणुकीचे (MLC Election result) मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. एक एक आमदाराचे मत महत्त्वाचे असणार आहे. तिन्ही पक्षांनी आपले आमदार आधीच हॉटेलमध्ये ठेवले होते. पण, राष्ट्रवादीचे तीन आमदार अजूनही मुंबईत न पोहोचल्यामुळे चिंतेचं वातावरण पसरलं आहे.
विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपचे आमदार विधान परिषदेत दाखल झाले आहे. भाजपच्या आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. आतापर्यंत 15 आमदारांनी मतदानही केलं आहे. पण, राष्ट्रवादीचे आमदार अजूनही मुंबईत पोहोचले नसल्याचे समोर आलं आहे.
राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते अद्याप मुंबईत पोहोचलेले नाही. तर आशुतोष काळे हे सुद्धा मुंबईत अद्याप पोहोचले नसल्याचे वृत्त आहे. तर दिलीप मोहिते पाटील यांच्याबाबतही कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, हे तिन्ही आमदार मतदान प्रक्रिया पार संपण्याच्याआधी मुंबईत पोहोचतील, असं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे.
क्षितीज ठाकूर अमेरिकेतून मुंबईत दाखल
विधान परिषद निवडणुकीसाठी आता काही तासं उरले आहे. अपक्षांचे मत मिळवण्यासाठी तिन्ही पक्षांनी मनधरणी केली आहे. अशातच बहुजन विकास आघाडीचे नेते हिंतेंद्र ठाकूर यांच्या पक्षाचे तीन मत महत्त्वाची ठरणार आहे. पण विधान परिषद निवडणुकीला बहुजन विकास आघाडीचे एक मत कमी पडणार असल्याची शक्यता होती. पण, ऐन शेवटच्या क्षणी ही शक्यता आता दूर झाली आहे. आमदार क्षितीज ठाकूर हे मुंबईत दाखल झाले आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडीचे तिन्ही आमदार मतदान करणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.