Home /News /mumbai /

विधान परिषदेच्या निवडणुकीचा 'असा' आहे नंबर गेम, भाजप पुन्हा चमत्कार घडवणार?

विधान परिषदेच्या निवडणुकीचा 'असा' आहे नंबर गेम, भाजप पुन्हा चमत्कार घडवणार?

महाविकास आघाडीतील पक्षीय संख्याबळ पाहीलं तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार निवडून येतील एवढं संख्याबळ या दोन्ही पक्षांकडे आहे.

मुंबई, 19 जून : विधान परिषदेची (MLC Election) उद्या होत असलेल्या निवडणुकीत 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. राज्यसभा निवडणुकीप्रमाणे (Rajya Sabha Election) विधान परीषद निवडणूकही बिनविरोध न होता अटीतटीच्या लढतीने होत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राज्यसभा निवडणुकीप्रमाणे विधान परीषदेचं मतदान होणार नाहीय. विधान परीषदेचं मतदान हे गुप्त मतदान पद्धतीने होणार आहे. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघीडीसोबतच (Maha Vikas Aghadi) विरोधी पक्ष भाजपनेही त्यांच्या आमदारांना हॉटेलमध्ये सुरक्षित ठेवलंय. कारण मतदार फुटण्याचा धोका जसा महाविकास आघाडीतील पक्षांना आहे तसाच तो भाजपलाही (BJP) आता आहे. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे अपक्ष आमदार फुटले आणि त्याचा मोठा फायदा भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी झाला. हाच धोका टाळण्याचं प्रमुख आव्हान आता महाविकास आघाडीतील तीनही पक्षांसमोर आहे. महाविकास आघाडीतील पक्षीय संख्याबळ पाहीलं तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार निवडून येतील एवढं संख्याबळ या दोन्ही पक्षांकडे आहे. काँग्रेसचा एक उमेदवार सहज निवडून येईल. मात्र दुसऱ्या उमेदवाराला निवडून आणण्याचं आव्हान काँग्रेससमोर आहे. त्यासाठी त्यांना पहिल्या पसंतीच्या 10 मतांची गरज आहे. काँग्रेसला ही अतीरिक्त मतं पुरवण्यासाठी आवश्यक असलेली मतं शिवसेनेकडे आहेत. शिवसेनेकडे लहान पक्षांचे आणि अपक्ष आमदारांची मिळून 10 अतिरीक्त मतं आहेत. शिवसेनेच्या अतिरीक्त मतांवरच काँग्रेसच्या दूसऱ्या उमेदवाराचा विजय अवलंबून आहे. त्यासाठी महाविकास आघाडी एकत्रित मतांचं समीकरण योग्य पद्धतीने कसं बसवतंय याकडे सर्वाचं लक्ष असेल. (महाविकास आघाडीच्या आमदारांची नार्को टेस्ट करा, आणि.... : सुधीर मुनगंटीवार) दूसरीकडे भाजपचे 4 उमेदवार सहज निवडून येतील एवढं संख्याबळ भाजपकडे आहे. मात्र भाजपचा पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला मोठं राजकीय कसब वापरावं लागणार आहे. त्यातही भाजपकडे लहान पक्ष आणि अपक्षांची अशी 8 अतिरिक्त मतं आहेत. त्यातच राज्यसभा निवडणुकीत भाजपने 9 आमदारांची मतं फोडण्यात यश मिळवलं होतं. भाजपला ही मतं विधान परीषदेतही मिळाली तर त्यांच्याकडे एकुण 123 मतं होत आहेत. त्यामुळे भाजपला पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी 7 मतं कमी पडत आहेत. त्यासाठी भाजपला महाविकास आघाडीची आणखी 7 मतं फोडावी लागणार आहेत. तरंच भाजपच्या पाचही उमेदवारांना निवडून आणन्यासाठी 130 मतांचा जादुई आकडा गाठता येईल. विधान परीषद निवडणुकीचे उमेदवार भाजप १. प्रविण दरेकर २. श्रीकांत भारतीय ३. राम शिंदे ४. उमा खापरे ५. प्रसाद लाड भाजपचे आमदार 106 + लहान पक्ष आणि अपक्ष आमदार 8 + राज्यसभा निवडणुकीत फोडलेले आमदार 9 = 123 (पाचवा उमेदवार जिंकण्यासाठी आणखी 7 मतांची गरज आहे.) शिवसेना १. सचिन अहिर २. आमशा पाडवी शिवसेना आमदार 55 + लहान पक्ष आणि अपक्ष आमदार 10 = 65 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस १. रामराजे नाईक निंबाळकर २. एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार 51 + अपक्ष 3 = 54 ( MIMच्या एका आमदाराने NCP ला समर्थन जाहीर केलंय. ) काँग्रेस १. चंद्रकांत हंडोरे २. भाई जगताप काँग्रेसचे 44 आमदार आहेत. त्यांना दुसरा उमेदवार जिंकून आणन्यासाठी 10 मतांची आवश्यकता आहे.
Published by:Chetan Patil
First published:

Tags: BJP, NCP, Shiv sena, काँग्रेस

पुढील बातम्या