Home /News /maharashtra /

महाविकास आघाडीच्या आमदारांची नार्को टेस्ट करा, आणि.... : सुधीर मुनगंटीवार

महाविकास आघाडीच्या आमदारांची नार्को टेस्ट करा, आणि.... : सुधीर मुनगंटीवार

महाविकास आघाडीतील आमदारांनाच हे सरकार असावं, असं वाटत नसल्याचा खळबळजनक दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

    अमरावती, 19 जून : राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीच्या (MLC election) पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) तीनही बडे पक्ष आणि भाजपकडून (BJP) आपले आमदार फुटू नयेत यासाठी हॉटेल डिप्लोमसी सुरु आहे. प्रत्येक पक्षाच्या बड्या नेत्यांची आमदारांसोबत बैठका सुरु आहेत. या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी अमरावतीत (Amrawati) एका कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली तेव्हा महाविकास आघाडी सरकार बद्दल मोठा दावा केला आहे. महाविकास आघाडीतील आमदारांनाच हे सरकार असावं, असं वाटत नसल्याचा खळबळजनक दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. त्यांच्या हा दावा कितपत खरा याबाबत शाश्वती नाही. पण महाविकास आघाडीत वारंवार बिघाडीच्या बातम्या समोर येताना दिसतात. विशेष म्हणजे पुण्यात काल काँग्रेस नेत्या आणि राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी सत्तेत असूनही सत्तेत असल्यासारखी वागणूक मिळत नसल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता मुनगंटीवार यांचं विधान समोर आलं आहे. "भारतीय जनता पक्ष कधीही सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत नाही. पण हे खरं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या सर्व चुकीच्या कारणांमुळे त्यांचे आमदार नाराज आहेत. त्यांची नार्को टेस्ट केली तर सर्वजण महाविकास आघाडी सरकार नको, असंच म्हणतील. कारण हे सरकार ज्या पद्धतीने वागतंय त्यानुसार येणाऱ्या 500 वर्षांसाठीच्या सरकारसाठी दिशादर्शक ठरेल. मानसाने कसं वागू नये हे या सरकारकडून शिकायला मिळेल", असा घणाघात सुधीर मुनगंटीवार यांनी केला. (आई-वडील शेतात, तीन बहिणी झोक्यात खेळत असताना अचानक काळाचा घाला....) सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी काँग्रेसवरदेखील निशाणा साधला. "काँग्रेसचा देशाच्या प्रगतीमध्ये नेहमीच बाधा टाकण्यासाठी हात असतो. आरोप केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेबाबत तेल टाकण्याचं काम विरोधी पक्ष करत आहे. अग्निपथबाबत तरुणांना योग्य माहिती देण्यात येईल. विरोधासाठी विरोध करायचा ही काँग्रेसची सवय आहे. विरोधी पक्षांनी अग्निपथबाबत गैरसमज निर्माण करू नये. काँग्रेसचा देशाच्या प्रगतीमध्ये नेहमीच बाधा टाकण्यासाठी हात असतो. काँग्रेस पक्ष आता विसर्जित केला पाहिजे. ते महात्मा गांधींचं देखील स्वप्न होतं", अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
    First published:

    Tags: BJP, Maharashtra politics, Sudhir mungantiwar, काँग्रेस

    पुढील बातम्या