जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / शिवसेनेच्या नगरसेवकांना राष्ट्रवादीत का दिला प्रवेश? रोहित पवारांनी सांगितलं कारण

शिवसेनेच्या नगरसेवकांना राष्ट्रवादीत का दिला प्रवेश? रोहित पवारांनी सांगितलं कारण

शिवसेनेच्या नगरसेवकांना राष्ट्रवादीत का दिला प्रवेश? रोहित पवारांनी सांगितलं कारण

राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी नगरसेवकांच्या पक्षांतरावर खुलासा केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 7 जुलै : राज्यातील सत्तेत एकत्र काम करणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये काहीसा तणाव निर्माण करणारी घटना घडली. पारनेरमधील शिवसेनेच्या 5 नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. हे दोन्ही पक्ष एकत्र सत्तेत असताना आणि आगामी निवडणुकांमध्ये एकजुटीने लढण्याचा धावा करत असताना घडलेल्या या घटनेमुळे महाविकास आघाडीत तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याचं बोललं जाऊ लागलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी खुलासा केला आहे. ‘महाविकास आघाडीत सर्व निर्णय चर्चा करूनच होता. पारनेरमधील शिवसेनेचे नगरसेवक अंतर्गत वादामुळे दुसऱ्या पक्षात जाणार होते. महाविकास आघाडीचा भाग नसलेल्या पक्षात त्यांच्या प्रवेश होणार होता. याचा आगामी निवडणुकीत आघाडीला फटका बसला असता. त्यामुळे आम्ही त्यांना आमच्या पक्षात घेतलं,’ असं स्पष्टीकरण रोहित पवार यांनी दिलं आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते. नगरसेवकांचं पक्षांतर आणि स्थानिक राजकारण राष्ट्रवादीत दाखल झालेल्या नगरसेवकांमध्ये शिवसेनेचे नगरसेवक नंदकुमार देशमुख,डॉ. मुद्दस्सीर सय्यद,किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने या नगरसेवकांचा समावेश आहे, तर शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख उमताई बोरुडे, उद्योजक सहदेव तराळ, शैलेश औटी, संतोष गंधाडे, राजेश चेडे आदींनी यावेळी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला.विधानसभा निवडणुकी पाठोपाठ नगरपंचायतीतील सत्ताबदल अपेक्षित होते. मात्र माजी आमदार विजय औटी यांनी नगराध्यक्ष वर्षा नगर यांना विधानसभेमध्ये केलेल्या मदतीमुळे संरक्षण दिले. त्यातच शिवसेनेचे काही नगरसेवक नाराज झाले. नगरपंचायत निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्या निवडणुकीमध्ये आमदार निलेश लंके यांच्या गटाचे वर्चस्व राहण्याची शक्यता वाटू लागल्यामुळे निवडणुकीमध्ये आपल्याला फायदा मिळावा म्हणून या नगरसेवकांनी थेट राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. तसेच नगरपंचायतमध्ये गेल्या साडे चार वर्षांमध्ये विकास कामांमध्ये अडवणूक केली गेल्याचा आरोप या नगरसेवकांनी माजी आ.औटी यांच्यावर केला आहे. यापुढे निलेश लंके यांच्यासोबत राहणार असल्याचे स्पष्ट मत नगरसेवकांनी व्यक्त केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात