• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • जमिनीसाठी इमानाशी बेईमानी, कोट्यवधी रुपये लाटणाऱ्या 2 सरकारी अधिकाऱ्यासह एकाला अटक

जमिनीसाठी इमानाशी बेईमानी, कोट्यवधी रुपये लाटणाऱ्या 2 सरकारी अधिकाऱ्यासह एकाला अटक

मीरा भाईंदर महानगरपालिकेतून कोट्यवधी रुपयांच्या इमारती बांधण्याकरता परवानग्या मिळवल्या होत्या.

  • Share this:
ठाणे, 12 जून :  अखेर बहुचर्चित मीरा भाईंदर ULC हेरफार प्रकरणी 2 सरकारी अधिकारी (government officers) आणि एका वास्तुविशारद (architect) यांना ठाणे गुन्हे शाखेने (Thane Police) अटक केली आहे. मीरा भाईंदर महापालिकेचे (mira bhayander municipal corporation) निवृत्त नगररचनाकार सत्यवान धनेगावे, वास्तुविशारद शेखर लिमये आणि यूएलसी कार्यालयातील कर्मचारी भरत कांबळे या तिघांना अटक केली आहे. तर पालिकेचे प्रभारी सहाय्यक संचालक नगररचना दिलीप घेवारे यांचा पोलीस शोध घेत आहे. तत्कालीन एका माजी ठाणे पोलीस आयुक्त यांच्याविरुद्धच्या तक्रारीनंतर या गुन्ह्याचा तपास पुन्हा सुरू झाला आहे, असे बोलले जात आहे. आर्थिक फायदा मिळवण्याकरता भाईंदरमधील अनेक विकासकांनी रेसिडेन्शल झोन म्हणजेच रहिवास क्षेत्र असताना देखील ग्रीन झोन म्हणजेच हरित क्षेत्र भासवून युएलसी अंतर्गत कोट्यवधी रुपयांची सवलत मिळवण्याकरता बनावट कागदपत्रे तयार केली होती आणि याच आधारे या विकासकांनी मीरा भाईंदर महानगरपालिकेतून कोट्यवधी रुपयांच्या इमारती बांधण्याकरता परवानग्या मिळवल्या होत्या. यामुळे महापालिकेची पर्यायाने राज्य सरकारची कोट्यवधी रुपयांचे फसवणूक झाली होती. या संबंधी ठाणे पोलिसांत एक तक्रारार प्राप्त झाल्यानंतर ठाणे नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करुन प्रकरणाचा तपास ठाणे गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता. दिलासा! ESICची महत्त्वाची स्कीम, कोविडमुळे मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळेल पगार २०१६ या वर्षी या प्रकरणाची चौकशी देखील सुरू करण्यात आली होती. सर्वे क्रमांक ६६४ , ६६३, ५६९/ १, ४ , ६६१/१,२, ३आणि ६६२ / २ ह्या जमिनी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यातआला होता. डीपी प्लान म्हणजे, विकास आराखड्या नुसार या सर्व्हेचे भूखंड हे रहिवासी क्षेत्रात असताना त्या हरित क्षेत्रात असल्याचे दाखवून २००० सालची युएलसी मधून सवलत मिळाल्याची बनावट प्रमाणपत्रे २००३-२००४ सालात बनवण्यात आली होती. तपासात दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार ठाण्याच्या युएलसी विभागात खाजगी कँडिडेट म्हणून कामकरणाऱ्या विश्वरूप उर्फ बबन पारकर याने २००३ - २००४साली अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून हरित क्षेत्राची प्रमाणपत्रेटायपिंग करून घेतली व त्यावर २००० साल टाकले. पावसात भिजल्यानंतर फक्त डोकं नाही, कानही नीट स्वच्छ करा; नाहीतर बळावेल मोठा धोका धक्कादायक म्हणजे, अर्ज नसतानाही खोटे अर्ज बनवण्यात आले आणि त्याची नोंद आयत्या वेळेस रजिस्टरमध्ये फेरफार करुन करण्यात आली. या प्रकरणी तत्कालीन तपास अधिकारी भरत शेळके यांच्या टीमने विकासक मनोज पुरोहित, रतिलाल जैन, शैलेश शेवंतीलाल शाह, उयामसुंदर अग्रवाल सह विश्वरूप उर्फ बबन पारकर यांना अटक केली होती. तर तपासादरम्यान अशाच प्रकारे अनेक ULC ची खोटी प्रमाणपत्रे बनवण्यात आली होती याचा खुलासा झाला होता. यानंतर ठाणे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा लक्ष्मीकांत पाटील यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला तर सहाय्यक पोलीस आयुक्त सरदार पाटील यांना तपास अधिकारी म्हणुन नेमण्यात आले आणि तपासा दरम्यान आढळलेल्या काही पुराव्यानुसार या प्रकरणात मीरा भाईंदर महानगरपालिकेचे निवृत्त नगररचनाकार सत्यवान धनेगावे, वस्तू विशारद शेखर लिमयेसह तत्कालीन युएलसी विभागातील कर्मचारी भरत कांबळे ह्या तिघांना पोलिसांनी चौकशी अंती आज अटक केली आहे. तर घोटाळ्या वेळी ठाणे जिल्हा नगरचना कार्यलयात कार्यरत असलेले आणि सध्या मीरा भाईंदर महापालिकेचे प्रभारी नगररचना सहाय्यक संचालक असलेले दिलीप घेवारे यांचा ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक शोध घेत आहेत. या विषयी ठाणे पोलिसांनी अलर्ट देखील जारी केले आहे.
Published by:sachin Salve
First published: