• Home
 • »
 • News
 • »
 • heath
 • »
 • पावसात भिजल्यानंतर फक्त डोकं नाही, तर कानही नीट स्वच्छ करा; नाहीतर बळावेल मोठा धोका

पावसात भिजल्यानंतर फक्त डोकं नाही, तर कानही नीट स्वच्छ करा; नाहीतर बळावेल मोठा धोका

कानाच्या छोट्या छोट्या समस्यांकडेही दुर्लक्ष करू नका.

 • Share this:
  मुंबई, 12 जून :  पावसात भिजायला प्रत्येकाला आवडतं. पण अनेकांना यानंतर आरोग्याच्या समस्या उद्भवतात. पावसात भिजल्यानंतर डोकं नीट स्वच्छ कर असं आपली आई किंवा आजी सांगते. जेणेकरून आपल्याला सर्दी होणार नाही, ताप येणार नाही. पण तुम्हाला माहिती आहे का? पावसात भिजल्यानंतर किंवा अंघोळीनंतर कानही नीट स्वच्छ करणं गरजेचं आहे. नाहीतर कानाला गंभीर इन्फेक्शन (Ear infection) होण्याचा धोका असतो. ओटिटिस (Otits) म्हणजेच कानाला होणाऱ्या बुरशीजन्य संसर्गाचा  धोका सध्या वाढताना दिसून येत आहे. सर्व वयोगटातील लोकांमध्ये कानात बुरशी होण्याचा त्रास पाहायला मिळत आहे. या संसर्गामुळे कान सतत दुखत राहिल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधोपचार घेऊ नका. कानाच्या दुखण्यावर वेळीच निदान व उपचार झाल्यास कान लवकर बरा होऊ शकतो. आणि भविष्यात कानाला होणारे नुकसान टाळता येऊ शकतात. मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. प्रशांत केवले म्हणाले की, "ऑटोमायकोसिस हा एक बुरशीजन्य आजार आहे. या आजारात मुख्यतः कानाला संसर्गाचा धोका अधिक असतो. बुरशीजन्य कानात होणारं संक्रमण मुख्यत: कान कालवावर परिणाम करतं. बुरशीच्या वाढीमुळे कानदुखीचे रुग्ण सध्या मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी येत आहेत. महिनाभरात 30-40 रुग्ण अशाप्रकारच्या समस्या घेऊन येत आहेत" हे वाचा - कोरोनामुक्त झाल्यानंतर मंदावलेली भूक, अ‍ॅसिडीटीकडे बिलकुल दुर्लक्ष नको कारण... "दूषित पाण्यात पोहोणं, कानाला आघात होणं आणि मधुमेह या कारणांमुळे कानाला संसर्ग होऊ शकतो. मात्र अद्यापही कानदुखी सारख्या रोगांकडे फारसं गांभीर्याने पाहिलं जात नसल्याने दुर्लक्षामुळे हा धोका अधिक वाढण्याची भीती आहे. कानात पाणी शिरणं अथवा वेळेत ते काढलं न जाणं यामुळे कानात बुरशी होण्याची अनेक उदाहरणे सध्या दिसून येत आहेत. बुरशी होणं हा गंभीर रोग नसला तरी त्याकडे वेळेच लक्ष देऊन वैद्यकीय उपचार घ्यावेत. अन्यथा घरातील चुकीच्या उपचारांमुळे बुरशीची वाढ झपाट्याने होऊन समस्या अधिक गंभीर होऊ शकते", असा सल्ला डॉ. केवले यांनी दिला आहे. कानाला बुरशी संसर्ग झाल्याची लक्षणं कान लाल होणं श्रवणशक्ती कमी होणं कानाच्या आतील त्वचा खराब होणं कान दुखणं कानात जळजळ कानाला सूज येणं कानाच्या त्वचेला रॅशेस येणं कानात तयार झालेला मळ बाहेर न पडणं हे वाचा - कोरोना काळात सर्दी-खोकला दूर ठेवण्यासाठी 'हा' काढा आहे रामबाण उपाय झेन मल्टीस्पेशालिटी रूग्णालयातील कान-नाक-घसा सर्जन डॉ. शलाका दिघे म्हणाल्या की, "वयोवृद्धांमध्ये कान दुखण्याची ही एक सामान्य समस्या आहे. कानात संक्रमण झाल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. कानाला बुरशी संसर्ग होण्यापासून रोखण्यासाठी कानात पाणी साचू देऊ नका, आंघोळीनंतर कान सुकवा, कानात तेल टाकणं टाळा, कानात मोठ्याने ओरडू नका आणि कान नियमितपणे स्वच्छ करा. नाकात मळ साचलेला असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळीच उपचार घ्या. मळ काढण्यासाठी ईअरबड्सचा वापर करणं शक्यतो टाळा"
  Published by:Priya Lad
  First published: