• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • "मंत्री झाले आपल्या विभागाचे राजे आणि प्रत्येक विभागात एक वाझे", फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

"मंत्री झाले आपल्या विभागाचे राजे आणि प्रत्येक विभागात एक वाझे", फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

Devendra Fadnavis takes a dig on MVA Government: भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत संबोधित करताना फडणवीसांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

  • Share this:
मुंबई, 24 जून: राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार हल्लाबोल केला आहे. आज माझ्यासमोर हा सवाल आहे, जे महाराष्ट्रात चालले आहे ते सरकार आहे का? असा प्रश्नही देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत संबोधित करताना फडणवीसांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. मंत्री आपल्या विभागाचे राजे आणि प्रत्येक विभागात एक वाझे देवेंद्र फडणवीस म्हणाले, "एकूणच महाराष्ट्राची परिस्थिती आज आपल्या समोर आली. आज माझ्यासमोर हा सवाल आहे, जे महाराष्ट्रात चालले आहे ते सरकार आहे का? सरकार म्ङणून अस्तित्व कुठे आहे. मंत्री झाले आपल्या विभागाचे राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक वाझे... ही अवस्था महाराष्ट्रात पहायला मिळत आहे." सरकार आहे की सर्कस? महाराष्ट्राच्या इतिहासात भ्रष्टाचार, अनाचार, अत्याचार यांनी बरबटलेलं अशा प्रकारची व्यवस्था गेल्या 60 वर्षांत आपण पाहिलेली नाहीये. कुठल्याही सरकारला एक मुख्यमंत्री असतो मात्र, या सरकारमधला मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजतो, राज्यमंत्री सुद्धा स्वत:ला मुख्यमंत्री समजतो. सरकार आहे की सर्कस असा प्रश्न पडावा ही आजची परिस्थिती निर्माण झाली आहे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. "तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो": देवेंद्र फडणवीस या सरकारला आम्ही झोपू देणार नाही भाजप 26 तारखेचं आंदोलन करुन शांत बसणार नाही. ओबीसींचं राजकीय आरक्षण जोपर्यंत परत येणार नाही तोपर्यंत या सरकारला आम्ही झोपू देणार नाही. आता हा संघर्ष अटळ आहे. तुम्हाला नसेल जमत तर मदत मागा आम्ही मदत करायला तयार आहोत. ओबीसींसाठी संघर्ष करु. पण जर ओबीसींना फसवाल तर भाजप शांत बसणार नाही असंही देवेंद्र फडवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीसांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे आज माझ्यासमोर हा सवाल आहे, जे महाराष्ट्रात चालले आहे ते सरकार आहे का? मंत्री झाले आपापल्या विभागाचे राजे आणि प्रतेक विभागात एक वाझे अशी अशी अवस्था आहे कुठल्याही सरकारमध्ये एक मुख्यमंत्री असतो इथे खूप आहे सरकार आहे का सर दर्द आहे कोविड काळात चांगलं काम केलं म्हणून सरकारची पाठ थोपटतात मला विचारावंस वाटते की तुमचे डोके ठिकाणावर आहे का? देशात जितके लोक मेले त्यापैकी प्रतेक तिसरी व्यक्ती ही महाराष्ट्रातील होती हेच मॉडेल असेल तर मग हे मृत्यूचे मॉडेल आहे तुम्ही महाराष्ट्राचे मॉडेल सांगता...पण मुंबईच्या बाहेर महाराष्ट्र आहे का? नागपूर, औरंगाबाद महाराष्ट्रात आहे का? तुम्ही इथे जम्बो सेंटर काढले तिथे एक तरी काढले का? इथ भ्रष्टाचार बोकाळला आहे आज अवस्था काय आहे पोलीस विभागातील वझे सापडला आहे. आणि इतर विभागातील वझे चे पत्ते आमच्याकडे आहे म्हणून त्यांनी दोन दिवसाचे अधिवेशन घेत आहे अधिवेशन पासून हे सरकार पळ काढत आहे OBC मुद्यावर केस कोणी केली? एक काँग्रेस आमदाराचा मुलगा आणि दुसरा काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष आमचे सरकार असे पर्यंत 50 टक्केंच्यावरचे आरक्षण आम्ही वाचवले पण यांच्या काळात तर 50 टाक्यांच्या आत मधल्या आरक्षणाची चर्चा सुरू झाली
Published by:Sunil Desale
First published: