मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /"तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो": देवेंद्र फडणवीस

"तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो": देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanavis on OBC political reservation: ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा आणखी तापला आहे. या मुद्द्यावरुन भाजपने आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे.

Devendra Fadanavis on OBC political reservation: ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा आणखी तापला आहे. या मुद्द्यावरुन भाजपने आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे.

Devendra Fadanavis on OBC political reservation: ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा आणखी तापला आहे. या मुद्द्यावरुन भाजपने आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई, 24 जून: ओबीसींचे राजकीय आरक्षण (OBC Political Reservation) पुर्ववत आणण्याच्या मागणीवरुन भारतीय जनता पक्षाने (BJP) आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत आव्हान दिलं आहे. तसेच आपण चार महिन्यांत ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करु असंही त्यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीस म्हणाले, जाणीवपूर्वक ओबीसींना राजकीय आरक्षणच द्यायचं नाहीये. उठलं तर केंद्राकडे बोट दाखवतात. अरे नसेल तुमच्यात हिंमत तर आम्हाला सांगा, आम्ही जर चार महिन्यात... हो आमचं राज्य असंत... चार महिन्यात ओबीसींचा एम्पिरिकल डेटा तयार करुन जर ओबीसींचं आरक्षण पूर्ववत आणलं नाही तर पदावर देखील राहणार नाही.

इच्छा असावी लागते, या ठिकाणी इच्छाच नाहीये. ज्यावेळी हायकोर्टात विषय मांडायला हवा होता त्यावेळी हायकोर्टात तारखा घेत होता आणि मंत्री रस्त्यावर मोर्चा काढत होते. आजही पाहा इम्पेरिकल डेटा तयार करत नाहीयेत तर त्याऐवजी यांचेच कार्यक्रम, मोर्चे सुरू आहेत असंही फडणवीस म्हणाले.

भाजपच्या रडारवर आता अजितदादा?

या सरकारला आम्ही झोपू देणार नाही

भाजप 26 तारखेचं आंदोलन करुन शांत बसणार नाही. ओबीसींचं राजकीय आरक्षण जोपर्यंत परत येणार नाही तोपर्यंत या सरकारला आम्ही झोपू देणार नाही. आता हा संघर्ष अटळ आहे. तुम्हाला नसेल जमत तर मदत मागा आम्ही मदत करायला तयार आहोत. ओबीसींसाठी संघर्ष करु. पण जर ओबीसींना फसवाल तर भाजप शांत बसणार नाही असंही देवेंद्र फडवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

आज माझ्यासमोर हा सवाल आहे, जे महाराष्ट्रात चालले आहे ते सरकार आहे का?

मंत्री झाले आपापल्या विभागाचे राजे आणि प्रतेक विभागात एक वाझे अशी अशी अवस्था आहे

कुठल्याही सरकारमध्ये एक मुख्यमंत्री असतो इथे खूप आहे

सरकार आहे का सर दर्द आहे

कोविड काळात चांगलं काम केलं म्हणून सरकारची पाठ थोपटतात

मला विचारावंस वाटते की तुमचे डोके ठिकाणावर आहे का?

देशात जितके लोक मेले त्यापैकी प्रतेक तिसरी व्यक्ती ही महाराष्ट्रातील होती

हेच मॉडेल असेल तर मग हे मृत्यूचे मॉडेल आहे

तुम्ही महाराष्ट्राचे मॉडेल सांगता...पण मुंबईच्या बाहेर महाराष्ट्र आहे का? नागपूर, औरंगाबाद महाराष्ट्रात आहे का?

तुम्ही इथे जम्बो सेंटर काढले तिथे एक तरी काढले का?

इथ भ्रष्टाचार बोकाळला आहे

आज अवस्था काय आहे पोलीस विभागातील वझे सापडला आहे. आणि इतर विभागातील वझे चे पत्ते आमच्याकडे आहे

म्हणून त्यांनी दोन दिवसाचे अधिवेशन घेत आहे

अधिवेशन पासून हे सरकार पळ काढत आहे

OBC मुद्यावर केस कोणी केली? एक काँग्रेस आमदाराचा मुलगा आणि दुसरा काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष

आमचे सरकार असे पर्यंत 50 टक्केंच्यावरचे आरक्षण आम्ही वाचवले

पण यांच्या काळात तर 50 टाक्यांच्या आत मधल्या आरक्षणाची चर्चा सुरू झाली

First published:

Tags: Devendra Fadnavis, Maharashtra