• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • मिलिंद देवरांच्या पत्रामुळे पक्षात खळबळ, काँग्रेसच्या मंत्र्यांची सोनियांकडे तक्रार

मिलिंद देवरांच्या पत्रामुळे पक्षात खळबळ, काँग्रेसच्या मंत्र्यांची सोनियांकडे तक्रार

शिवसेना-राष्ट्रवादी आपले अजेंडे पुढे नेत आहेत, मात्र आतापर्यंत काँग्रेसच्या मंत्र्यांनी एकही मोठा निर्णय घेतल्याचं पुढे आलं नाही.

  • Share this:
मुंबई 28 जानेवारी : उद्धव ठाकरे सरकारमध्ये सगळच काही आलबेल नाही हे आता पुढं येतंय. नेत्यांचं मानापमान, वक्तव्य यामुळे कुरबुरी सुरूच आहेत. असं असतानाच माजी खासदार आणि राहुल गांधी यांचे विश्वासू असलेला मिलिंद देवरा यांनी थेट काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनाचत पत्र लिहिलंय. पक्षाने आक्रमक भूमिका घेतली नाही तर त्याचा फटका बसू शकतो असं पत्र देवरांनी सोनिया गांधी यांना लिहीलंय. देवरांच्या या पत्रामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली असून सोनिया गांधी यांची दखल घेतील अशी शक्यता व्यक्त केलीय जातेय. महाविकास आघाडीचं सरकार येवून आता तीन महिने होत आहेत. या काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी आपापले अजेंडे पुढे नेत आहेत. मात्र या काळात काँग्रेसचा फारसा प्रभाव दिसला नाही. त्यामुळे काँग्रेस मंत्र्यांच्या कामगिरीविषयी चिंता व्यक्त केली जातेय. ही नाराजी मिलिंद देवरांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून व्यक्त केलीय. मिलिंद देवरांनी लिहिलंय की, महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षाने जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी आग्रही भूमिका घेतली पाहिजे. सरकारमध्ये शिवसेना आणि एनसीपी पक्ष त्यांचे अजेंडे पूर्ण करत आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्षानेही जनतेला दिलेल्या आश्वासन याची पुर्तता करण्यासाठी आग्रही राहिलं पाहिजे. निवडणुकीच्या काळात पक्षाने जनतेला जी आश्वासन दिली होती त्याची पूर्तता करण्यासाठी पाठपुरावा वेगात केला पाहिजे असंही त्यांनी पत्रात म्हटलेलं आहे. 'एकच वादा अजितदादा', असं का म्हणतात 'हे' वाचून येईल तुम्हाला अंदाज! शिवसेनेने 10 रुपयांमध्ये शिवथाळी, कोस्टलरोड, कर्जमाफी अशा योजना तर राष्ट्रवादीने इंदू मील आणि इतर अनेक प्रश्नांवर निर्णय घेत आपलं अस्तित्व ठळपणे दिसेल अशी काळजी घेतलीय. मात्र आतापर्यंत काँग्रेसच्या मंत्र्यांनी एकही मोठा निर्णय घेतल्याचं पुढे आलं नाही. तहानलेल्यांला पाणी न पाजणारा पुढच्या जन्मी होणार बेडूक, चंद्रकांत खैरेंवर टीका परस्थिती अशीच राहिली तर त्याचा फटका काँग्रेसला बसू शकतो असा सूचक इशाराच देवरा यांनी सोनिया गांधींना दिला आहे. त्यामुळे यापुढच्या काळात काँग्रेस हायकमांडकडून काँग्रेसच्या मंत्र्यांना खास निर्देश मिळतील अशी शक्यताही व्यक्त केली जातेय.
Published by:Ajay Kautikwar
First published: