तहानलेल्यांला पाणी न पाजणारा पुढच्या जन्मी होणार बेडूक, प्रितम मुंडेंची चंद्रकांत खैरेंवर टीका

तहानलेल्यांला पाणी न पाजणारा पुढच्या जन्मी होणार बेडूक, प्रितम मुंडेंची चंद्रकांत खैरेंवर टीका

शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या टीकेला उपोषणाला आलेल्या महादेव जानकर, सुरेश धस आणि खासदार प्रितम मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले.

  • Share this:

सिद्धार्थ गोदाम,(प्रतिनिधी)

औरंगाबाद, 27 जानेवारी: भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मराठवाडा ग्रीड योजनेसाठी औरंगाबादेत एक दिवशीय लाक्षणिक उपोषण केलं. आपण उपोषण करणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाणच्या वतीने होणार असल्याचे पंकजा मुंढे यांनी 12 डिसेंबर 2019 रोजी भगवाड गडावरच जाहीर केलं होतं. मात्र, एक दिवस आधी या आंदोलनात भाजपने उडी घेतली. भाजपने ऐनवेळी पाठिंबा दिल्याने हे आंदोलन भाजप आणि गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाण असे संयुक्त झाले. तरीही पंकजा मुंडे यांनी हे आंदोलन माझेच आहे, अशी टिप्पणी केली. त्यामुळे भाजप नेत्यांच्या भूवया उंचावल्या आहेत.

प्रितम मुंडेंची चंद्रकांत खैरेंवर खोचक टीका

शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या टीकेला उपोषणाला आलेल्या महादेव जानकर, सुरेश धस आणि खासदार प्रितम मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले. मजेशीर उत्तर दिले ते पंकजा मुंढे यांच्या भगिनी प्रितम मुंडे यांनी. मराठवाड्याच्या नागरिकांच्या तोंडात जाणाऱ्या पाण्याला चंद्रकात खैरे का विरोध का करत आहेत? असा सवाल प्रितम मुंडे यांनी केला. चांगल्या कामाला पाठिंबा देता येत नाही तर कामाला विरोधही करू नये. आपल्या मराठी संस्कृतीमध्ये तहानलेल्याला पाणी पाजावे पुण्य लागते, अशी भावना आहे. प्रितम मुंडे यांनी त्यांच्या आजीने सांगितलेली कथा सांगून चंद्रकांत खैरे यांची खिल्ली उडवली. प्रितम मुंडे म्हणाल्या, माझी आजी सांगायची एखाद्या भुकेल्याला जेवण दिले नाही तर चालेल. मात्र एखाद्या तहानलेल्याला पाणी पाजले नाही तर पुढचा जन्म बेडकाचा मिळतो. त्यामुळे पंकजा मुंडे या मराठवाड्यातील नागरिकांना पाणी पाजण्यासाठी उपोषण करत आहेत. तर चंद्रकांत खैरे या कामाला विरोध करत आहेत. म्हणून त्यांचा जन्म पुढाच्या वेळी काय असायचा तो असेल. मात्र मराठाड्याच्या विकासाचा मूलमंत्र असलेल्या पाण्यासाठी आता पंकजा मुंढे थांबणार नाहीत, असे प्रितम मुंडे यांनी या वेळी सांगितले. दरम्यान, पंकजा मुंडे सायंकाळी 4.30 वाजता आपले उपोषण सोडले.

पंकजांच्या उपोषणावर शिवसेना आणि एमआयएमची टीका.

पंकजा मुंडे यांच्या आंदोलनावर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांते खैरे आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी टीका केली होती. खासदार जलिल म्हणाले, पंकजा मुंडे यांचे आंदोलन एक नौटंकी आहे. सत्तेत असताना काम का केली नाहीत, आता उपोषण कशासाठी? असा प्रश्न त्यांनी केला. तर चंद्रकांत खैरे यांनी भाजपच्या उपोषणाला उत्तर देण्यासाठी शिवसेना मराठवाड्यात पाणी परिषद घेऊ असे जाहीर केले.

या भाजप नेत्यांनी लावली हजेरी..

हे आंदोलन पंकजा मुंढे यांचे एकटीचे वाटू नये, यासाठी आंदोलनाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी हजेरी लावली.

First published: January 27, 2020, 8:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading