Home /News /mumbai /

अरुण गवळीच्या दगडी चाळीच्या जागी उभारणार 40 मजली टॉवर; म्हाडाने सुरू केली पुनर्विकासाची प्रक्रिया, सर्व 10 इमारती पाडणार

अरुण गवळीच्या दगडी चाळीच्या जागी उभारणार 40 मजली टॉवर; म्हाडाने सुरू केली पुनर्विकासाची प्रक्रिया, सर्व 10 इमारती पाडणार

Redevelopment of Dagadi chawl दगडी चाळीच्या परिसरात एकूण 10 इमारती आहे. या 10 पैकी 8 इमारती अरुण गवळीच्या मालकीच्या आहेत. तर इथर दोन इमारतीही त्याच्या कुटंबीयांनी विकत घेतल्या असल्याची माहिती आहे.

    मुंबई, 20 मे : मुंबईत (Mumbai) एकेकाळी दहशत असलेला अंडरवर्ल्ड डॉन (Underworld Don) अरुण गवळीचं (Arun Gawli) घर असलेल्या दगडी चाळीच्या (Dagadi Chawl) जागी लवकरच टोलेजंग टॉवर (Tower) उभारले जाणार आहेत. या दगडी चाळीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्विकास मंडळ (MBRRB)ने घेतला आहे. मंडळाचे अध्यक्ष विनोद घोसाळकर यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. या चाळीतील सर्व इमारतींचा विकास केला जाणार आहे. (वाचा-लग्नात गर्दी पडली महागात; पोलिसांच्या शिक्षेमुळे बेडूक उड्या मारत काढली वरात) मुंबईत एकेकाळी ज्याचं राज्य होतं असं म्हणतात त्या अरुण गवळीचं साम्राज्य म्हणून दगडी चाळ परिसर ओळखला जातो. दगडी चाळीच्या परिसरात एकूण 10 इमारती आहे. या 10 पैकी 8 इमारती अरुण गवळीच्या मालकीच्या आहेत. तर इथर दोन इमारतीही त्याच्या कुटंबीयांनी विकत घेतल्या असल्याची माहिती आहे. पण आता या सर्व 10 इमारती जमीनदोस्त करून त्याठिकाणी म्हाडा 40 - 40 मजल्यांचे दोन टॉवर उभारणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. (वाचा - Jalna News : DYSP सह तीन पोलीस कर्मचाऱ्यांना 2 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलं) विनोद घोसाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार दगडी चाळीमध्ये एकूण 338 भाडेकरू आहेत. नव्या इमारतींमध्ये मूळ भाडेकरूंसाठी घरं असणार आहेत. तर उर्वरित घरंही विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. या इमारतींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे. संबंधित विकासकांना त्यासाठी लवकरच कागदपत्रांची पूर्तता केली जाईल. भाडेकरींच्या यादी तयार करण्याचं आणि इतर काम सध्या सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या सर्व संपत्तीची मालकी अरुण गवळी यांची आहे. त्यांनीच म्हाडाला पुनर्विकासासाठी प्रस्ताव दिला होता. त्यानंतर म्हाडानं चौकशी आणि कागदपत्रांची पडताळणी करून प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. सध्या याठिकाणी प्रत्येकी चार मजल्याच्या दहा इमारती आहेत. त्यापैकी दोन आधीच पाडण्यात आल्या आहेत. याठिकाणच्या भाडेकरुंची इमारतीचं काम होईपर्यंत सोय केली जाणार असल्याची माहिती आहे. अरुण गवळी सध्या शिवेसना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. आता या चाळीच्या प्रकरणामुळं पुन्हा एकदा अरुण गवळीचं नाव चर्चेत आलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Mumbai, Underworld don

    पुढील बातम्या