भोपाळ, 20 मे: कोरोनाच्या (Coronavirus) संकटात गर्दी न करण्याचे सर्वांना आवाहन करण्यात येत आहे. मात्र, असे असतानाही काही नागरिक सर्रासपणे नियमांचं उल्लंघन करताना दिसून येतात. अशाच प्रकारे लग्न समारंभात शेकडोंच्या संख्येत गर्दी करणं नागरिकांना चांगलंच महागात पडलं आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन (Covid norms) करणाऱ्या या सर्वांना पोलिसांनी चक्क बेडूक (frog) उड्या मारण्याची शिक्षा दिली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियातही जोरदार व्हायरल (Video viral) होत आहे.
बेडूक उड्यांच्या शिक्षेसह वरात
ही घटना मध्यप्रदेशातील भिंड (Bhind Madhya Pradesh) येथील आहे. पोलिसांना माहिती मिळाली होती की, उमरी येथील सरकारी रुग्णालयाच्या मागील बाजूला एका हॉस्टेलमध्ये लग्न सोहळा होत आहे आणि लग्नात 500 लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली तेथे तब्बल 200 हून अधिक नागरिक उपस्थित असल्याचं दिसून आलं. यावेळी पोलिसांना पाहून अनेकांनी पळ काढला. तर इतरांना पोलिसांनी पकडून बेडूक उड्या मारण्याची शिक्षा दिली.
VIDEO: लग्नात गर्दी करणं पडलं महागात; पोलिसांच्या शिक्षेमुळे बेडूक उड्या मारत काढावी लागली वरात pic.twitter.com/XQ1xHys4g2
— News18Lokmat (@News18lokmat) May 20, 2021
VIDEO: Lockdown चं उल्लंघन पडलं महागात; भररस्त्यात करावा लागला नागीन डान्स
या प्रकरणी पोलिसांनी नवरदेवाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या लग्नासाठी उपस्थित असलेल्या नागरिकांना एका रांगेत उभे केले आणि मग त्यांना बेडूक उड्या मारण्याची शिक्षा दिली. नवरदेवाचे नाव मुकेश असल्याची माहिती समोर आली आहे. तो सुंदरपूरा येथील निवासी असून त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
आदिवासी कल्याण विभागाच्या वसतिगृहात लग्नसोहळा कसा आयोजित केला? याचाही तपास पोलीस करत आहेत. या ठिकाणी लग्नाची परवानगी कशी मिळाली, कोणी परवानगी दिली तसेच वसतिगृहाच्या अधिक्षकांची भूमिका काय होती याचाही पोलीस तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Madhya pradesh, Viral videos