जालना, 20 मे : समाजामध्ये कायदा सुव्यवस्था कायम राहावी आणि सर्व काही सुरळीत चालावे यासाठी पोलीस जीव ओतून काम करत असतात. कोरोना, चक्रीवादळं कितीही संकटं असली तर 24 तास खाकी वर्दी (Police Duty) आपल्याला रस्त्यावर उतरून कर्तव्य पार पाडताना दिसते. मात्र काही पोलीस कर्मचारी हे या सर्व मेहनतीवर पाणी फेरणारे असतात. काही लाचखोर पोलिसांमुळे सर्वच पोलीस कर्मचारी बदनाम होता. अशाच काही लाचखोर पोलिसांना जालन्यात रंगेहात पकडण्यात आलं आहे. (3 Jalna policemen arrested for taking bribe ) जालल्यामध्ये लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात हे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अडकले आहेत. यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणजे पोलीस उपअधिक्षकांसह आणखी दोन जणांना रंगेहात पकडलं आहे. अॅट्रोसिटीच्या एका प्रकरणात मदत करण्यासाठी 5 लाखांची लाच या सर्वांनी मागितली होती. त्यापैकी काही रक्कम स्वीकारलाचा त्यांना पकडण्यात आलं आहे. (वाचा- मोदींच्या बैठकीवर ममता बॅनर्जी चिडल्या; उपस्थित होते 10 CM बोलले फक्त PM ) उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलीस नाईक संतोष अंभोरे आणि पोलीस शिपाई विठलं खार्डे असं अटक केलेल्या लाचखोर पोलिसांची नावं आहेत. अॅट्रोसिटी प्रकरणात मदत करण्यासाठी या सर्वांनी 5 लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र तडजोड करून 3 लाख रुपयांवर बोलणी ठरली. त्यानंतर गुरुवारी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात 2 लाख रुपयांची लाच घेताना त्यांना अटक करण्यात आली. पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून तिघांना अटक केली. (वाचा- कोरोना लसीकरण सेंटरवर येऊ शकत नाही त्यांचं काय? मुंबई HCचे BMC, केंद्रावर ताशेरे ) पोलिस कर्मचाऱ्यांसह वरिष्ठ अधिकारीदेखिल लाचेच्या प्रकरणात अडकल्यामुळे जालना पोलीस दलामध्ये एकच खळबळ माजली आहे. समाजामध्ये नागरिकांचं रक्षण करण्याचं काम पोलीस करत असतात. बहुतेक सर्व पोलीस कर्मचारी प्रामाणिकपणे त्यांचं काम करतात. पण अशा काही लाचखोरांमुळे अनेकदा प्रामाणिक पोलिसांनाही लोक संशयाच्या नजरेनं पाहतात. त्यामुळे अशा लाचखोर अधिकारी पोलिसांना असाच धडा शिकवणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.