Home /News /money /

नवीन घर घ्यायचा विचार करताय? 'ही' कंपनी देतेय 6.46 टक्के व्याजदराने होम लोन

नवीन घर घ्यायचा विचार करताय? 'ही' कंपनी देतेय 6.46 टक्के व्याजदराने होम लोन

नावी फिनसर्व्ह ( Navi Finserv) कडून कर्ज घेण्याची संपूर्ण प्रक्रिया ग्राहक या कंपनीच्या कुठल्याही ब्रँचला भेट न देता NAVI अॅपवर पूर्ण करू शकतात. कंपनी हे कर्ज देताना कोणतीही प्रोसेसिंग फी व इतर फी घेत नाही.

मुंबई, 8 जानेवारी : नावी फिनसर्व्ह ( Navi Finserv) ही आरबीआय ( RBI) नोंदणीकृत एनबीएफसी ( NBFC) NAVI अॅपद्वारे पात्र कर्जदारांना त्वरित होम लोन ( instant home loan) देत आहे. या होम लोनची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल ( digital) आहे. कंपनीचा दावा आहे, की त्यांची कर्ज मंजुरीची प्रक्रिया पारंपरिक बँकांपेक्षा वेगवान आहे. इतर बँकांच्या व्याजदराच्या तुलनेत व्याजदरही खूप स्पर्धात्मक (competitive) आहे. नावी फायनान्सकडून 6.46 टक्के व्याज दराने होम लोन मिळू शकतं. नव्या युगातल्या फिनटेक कंपन्यांकडून या प्रकारचं कर्ज घ्यावं, की त्यापेक्षा पारंपरिक बँका किंवा हाउसिंग फायनान्स कंपन्या हा एक चांगला पर्याय ठरू शकतो, हे आता पाहूया. त्यासाठी सर्वांत आधी नावी कंपनीची ऑफर काय आहे, हे जाणून घेऊ या. नावी कंपनी 25 वर्षांच्या मुदतीसह या ऑफरअंतर्गत 20 लाख ते 5 कोटी रुपयांपर्यंतचं होम लोन देत आहे. कंपनी बेंगळुरू, म्हैसूर, हुबळी, दावणगेरे, गुलबर्गा, चेन्नई, दिल्ली, गुरुग्राम आणि हैदराबाद यांसारख्या शहरांमध्ये ही सुविधा देत आहे. लवकरच ही सेवा मुंबई आणि पुण्यातही सुरू होणार आहे. या होम लोनचा व्याजदर वार्षिक 6.46 टक्क्यांपासून सुरू होतो. हा व्याजदर अशा ग्राहकांसाठी आहे, ज्यांचं उत्पन्न स्थिर आहे, क्रेडिट स्कोअर चांगला आहे आणि कर्ज परतफेडीचा रेकॉर्ड चांगला आहे. आठवडाभरातील 'सुपर स्टॉक्स', अवघ्या पाच दिवसात 90 ते 70 टक्के रिटर्न्स, तुमच्याकडे आहे का 'हे' शेअर्स? कर्ज घेण्याची संपूर्ण प्रक्रिया ग्राहक या कंपनीच्या कुठल्याही ब्रँचला भेट न देता NAVI अॅपवर पूर्ण करू शकतात. कंपनी हे कर्ज देताना कोणतीही प्रोसेसिंग फी व इतर फी घेत नाही. नेव्ही टेक्नोलॉजीज ही एक फिनटेक कंपनी आहे. 2018 मध्ये ही कंपनी फ्लिपकार्टचे सह-संस्थापक सचिन बन्सल आणि त्यांचे कॉलेजमधले मित्र अंकित अग्रवाल यांनी सुरू केली होती. कर्जासाठी असा करा अर्ज नावी कंपनीकडून अशा प्रकारचं कर्ज घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनवर NAVI अॅप डाउनलोड करावं लागेल. या अॅपवर तुमचं अकाउंट तयार करावं लागेल. तेथे तुम्हाला ज्या काही सूचना मिळतील, त्यानुसार तुम्हाला पॅन कार्ड, जन्मतारीख यांसारखी माहिती भरावी लागेल. तुमचं अकाउंट तयार झाल्यानंतर, तुम्हाला या अॅपद्वारे होम लोनचा अर्ज भरता येईल. या अॅपमध्ये तुमच्या बँक अकाउंटमधून ऑटो डेबिट करण्याची सुविधाही असेल. तज्ज्ञांचं म्हणणं आहे, की नेव्ही होम लोनचा व्याजदर आघाडीच्या बँका आणि हाउसिंग फायनान्स कंपन्यांच्या तुलनेत अतिशय स्पर्धात्मक आहे. येथे ग्राहकांना फिक्स्ड रेट आणि व्हेरिएबल रेट निवडण्याचा ऑप्शनदेखील देण्यात आला आहे. यामध्ये ग्राहकांच्या क्रेडिट स्कोअरच्या आधारे होम लोनची रक्कम ठरवली जाते. तसंच कंपनी ग्राहकाचं प्रोफाइल आणि कंपनीच्या इंटर्नल प्रायसिंग फ्रेमवर्कच्या आधारे व्याजदर ठरवते. कंपनी कोणत्याही मध्यस्थाशिवाय त्यांच्या अॅपद्वारे थेट ग्राहकांपर्यंत पोहोचते. त्यामुळे त्यांचा कर्ज देण्याच्या प्रक्रियेचा खर्च कमी होत असून, त्याचा फायदा ग्राहकांना व्याजदर कमी करून दिला जातोय. तसंच कंपनीकडून कोणत्याही प्रकारची प्री-पेमेंट फी घेतली जात नाही. Multibagger stocks : 'या' पेनी स्टॉक्सवर यावर्षी नजर, तुमच्या पोर्टफोलिओत आहेत का? माय मनीमंत्रा डॉट कॉमचे राज खोसला यांच्या मते, 'तुम्ही कर्ज घेण्यापूर्वी तुम्ही केवळ स्वस्त व्याजदराच्या आधारावर बाजारात उपलब्ध होम लोनची तुलना करू नये. ही तुलना करताना सेवेचा दर्जा आणि कर्जावर लागू होणारी अतिरिक्त फी लक्षात घ्यावी. नावी फायनान्स ही आरबीआय नोंदणीकृत एनबीएफसी असल्याने, कंपनीची ऑफर नियामक आणि एनबीएफसी लोकपाल यांच्या कक्षेत येते. त्यामुळे नावी अॅपद्वारे होम लोनसाठी अर्ज करणं सुरक्षित आहे.' नावीच्या अटी आणि शर्तींनुसार, कर्जाची परतफेड होईपर्यंत कर्जदारांना त्यांच्या मोबाइल डिव्हाइसवरून कंपनीचं अॅप अनइन्स्टॉल करता येणार नाही, हे लक्षात घ्यावं. निष्काळजीपणामुळे या नियमाचा भंग झाल्यास ती फसवणूक मानली जाईल आणि कर्जदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार कंपनीला असेल. तज्ज्ञांच्या मते, डिजिटल लेंडरकडून कर्ज घेणं सोयीचे आहे. परंतु या अंतर्गत कर्जदार आणि कर्ज देणारे यांचे संबंध पूर्णपणे डिजिटल आहेत. यामुळे कर्ज देणाऱ्याला कर्जदाराच्या फोनमध्ये असलेल्या माहितीचा अॅक्सेस मिळतो. फिनटेक कंपन्यांकडून ग्राहकाचा वैयक्तिक डेटा आणि होम लोनची कागदपत्रं सुरक्षित कशी ठेवली जातात, हे समजून घेतलं पाहिजे. दरम्यान, डिसेंबरमध्ये नावी कंपनीने अनेक युझर्सना पॅन डेटाच्या आधारे पर्सनल लोनच्या ऑफर पाठवल्यानंतर त्यांना टीकेला सामोरं जावं लागलं होतं. तसंच, या प्रकारच्या होम लोनसाठी अर्ज करण्यापूर्वी ग्राहकाने डिजिटल लेंडरच्या मॅनेजमेंटचं बॅकग्राउंड जाणून घेतलं पाहिजे. तुम्ही होम लोनसाठी डिजिटल लेंडरची निवड केल्यास, कर्जाचा कालावधी आणि कर्जाची रक्कम जितकी कमी असेल तितकं चांगलं. तुम्ही जुन्या परंपरेवर विश्वास ठेवत असाल, तर बँका आणि हाउसिंग फायनान्स कंपन्यांकडे तुमच्यासाठी अतिशय चांगल्या दरात गृहकर्ज उपलब्ध आहे.
First published:

Tags: Home Loan, Money

पुढील बातम्या