मुंबई, 8 डिसेंबर : नोकरी करणाऱ्यांना अनेकदा मोठ्या रकमेची गरज भासते. मुला-मुलीचे लग्न असो, कुणाचे आजारपण असो किंवा कोणताही मोठा कार्यक्रम असो. अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीकडून महागड्या व्याजावर कर्ज घेण्यापेक्षा बँकेकडून वैयक्तिक कर्ज (Personal Loan) घेणे चांगले. कोरोना महामारीमुळे अनेक लोक आर्थिक संकटात (Financial Crises) अडकले आहेत. अशा परिस्थितीत वैयक्तिक कर्ज हा एक चांगला पर्याय असू शकतो.
SBI आणि पंजाब नॅशनल बँकेने वैयक्तिक कर्जावर प्रक्रिया शुल्क (Processing Fee) न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. जर तुमचा क्रेडिट स्कोअर (Credit Score) चांगला असेल तर तुम्हाला सहज आणि स्वस्तात कर्ज मिळू शकते. वैयक्तिक कर्ज घेण्याचे अनेक फायदे आहेत. येथे आम्ही तुम्हाला या फायद्यांविषयी सांगत आहोत.
कोणत्याही सिक्युरिटीची आवश्यकता नाही
वैयक्तिक कर्ज हे असुरक्षित कर्ज आहे आणि त्यामुळे अर्जदाराला कर्जासाठी कोणतीही सिक्युरिटी देण्याची गरज नाही. बँका साधारणपणे कर्जदाराचे उत्पन्न, कॅश फ्लो, क्रेडिट स्कोअर आणि रिपेमेंट कॅपेसिटीच्या (Repayment Capacity) आधारे ही कर्जे देतात. या आधारे कर्जाची रक्कम आणि व्याजदर ठरवले जातात. चांगली रिपेमेंट कॅपेसिटी, चांगला क्रेडिट स्कोअर आणि उत्पन्न असणाऱ्या अर्जदाराला कमी व्याजाने कर्ज मिळते.
Multibagger stocks : 'या' पेनी स्टॉक्सवर यावर्षी नजर, तुमच्या पोर्टफोलिओत आहेत का?
तुम्ही तुमच्या गरजेनुसार वैयक्तिक कर्जाचे पैसे वापरू शकता. कोरोनाच्या काळात तुमचा वैद्यकीय खर्च किंवा इतर गरजा भागवण्यासाठी तुम्हाला पैशांची गरज असल्यास, तुम्ही वैयक्तिक कर्ज घेऊन या गरजा पूर्ण करू शकता. वैयक्तिक कर्जाची रक्कम थेट कर्जदाराला वितरित केली जाते. वैयक्तिक कर्ज घेण्यामागचा उद्देश सांगण्याची गरज नाही.
कर्जाचा कालावधी
वैयक्तिक कर्जे लवचिक परतफेड कालावधीसह येतात जी सहसा 12 महिने आणि 60 महिन्यांदरम्यान असते. अशा परिस्थितीत, तुमच्या गरजेनुसार तुम्हाला ज्या कालावधीसाठी कर्ज घ्यायचे आहे ते तुम्ही निवडू शकता. वैयक्तिक कर्जाशी संबंधित प्री-पेमेंट आणि प्री-क्लोजर चार्जेस आहेत.
प्री अप्रुव्ह्ड केल्यावर कर्ज सहज उपलब्ध होते
तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असल्यास, बँक तुम्हाला प्री अप्रुव्ह्ड वैयक्तिक कर्ज देऊ शकते. यामध्ये कमीत डॉक्युमेंटेशनसह झटपट कर्ज उपलब्ध आहे. कर्जाचा अर्ज बँकेने दिलेल्या लिंकद्वारे किंवा ऑनलाइन बँकिंगमध्ये लॉग इन करून करता येतो. तुम्ही स्वीकारल्यानंतर, काही मिनिटांत रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल. हे कर्ज तुम्हाला सहज आणि कमी व्याजदरात मिळू शकते.
आठवडाभरातील 'सुपर स्टॉक्स', अवघ्या पाच दिवसात 90 ते 70 टक्के रिटर्न्स, तुमच्याकडे आहे का 'हे' शेअर्स?
कर सूट मिळू शकते
वैयक्तिक कर्जावर कर आकारला जात नाही, कारण कर्जाची रक्कम उत्पन्न मानली जात नाही, परंतु लक्षात ठेवा की तुम्ही बँक किंवा NBFC सारख्या कायदेशीर स्रोताकडून कर्ज घेतले आहे. कर्जावरील कर सवलतीचा लाभ घेण्यासाठी, तुम्हाला अनेक कागदपत्रे दाखवावी लागतील. यामध्ये खर्चाचे व्हाउचर, बँकेचे प्रमाणपत्र, मंजुरी पत्र आणि ऑडिटरचे पत्र इत्यादी कागदपत्रांचा समावेश आहे.
पंजाब नॅशनल बँक आणि एसबीआयने प्रक्रिया शुल्क माफ केले
पंजाब नॅशनल बँकेने 31 डिसेंबरपर्यंत होम लोन, व्हेईकल लोन, माय प्रॉपर्टी लोन, पर्सनल लोन, पेन्शन लोन आणि गोल्ड लोन यांसारख्या उत्पादनांवर प्रक्रिया शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.